Mental Health : मानसिकदृष्ट्या मजबूत व्हायचंय? मग, 'या' सवयींचा तुमच्या डेली रूटीनमध्ये करा समावेश

Mental Health : मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुमच्या डेली रूटीनमध्ये काही छोट्या-मोठ्या सवयींचा समावेश करू शकता.
Mental Health
Mental Healthesakal

Mental Health : रोजचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि कामाचा अतिरिक्त ताण इत्यादी कारणांमुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना स्वत:साठी वेळ काढता येत नाही, हे देखील तितकेच खरे आहे. कामाचा ताण आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे याचा मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुमच्या डेली रूटीनमध्ये काही छोट्या-मोठ्या सवयींचा समावेश करू शकता. यामुळे, तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. शिवाय, तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहू शकता. कोणत्या आहेत त्या सवयी? चला तर मग जाणून घेऊयात.

Mental Health
Mental Health : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील 'ही' योगासने.. आजच करा सुरुवात!

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा

अनेकदा आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्येच काम करणे पसंत करतो. त्याबाहेर पडायला आपण घाबरतो. खरं तर जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून, काम करतो तेव्हा आपण काहीतरी नवे शिकतो. त्यामुळे, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, स्वत:वर विश्वास ठेवा आणि काहीतरी नवीन करून पाहा. यामुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल. यामुळे, तुम्हाला मानसिक समाधान मिळू शकेल. (Get out from comfort zone)

स्वत:ला वेळ द्या

मानवी आयुष्यात आपणच आपल्या सर्वात जवळचे आहोत. परंतु, आपण स्वत:ला किती वेळ देतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारून पाहणे गरजेचे आहे. कारण, आपण सर्वात कमी वेळ हा स्वत:ला देतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

त्यामुळे, स्वत:ला दररोज थोडा वेळ द्या आणि तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवर मंथन करा. स्वत:ला वेळ दिल्यामुळे आणि स्वत: सोबत संवाद साधल्यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच शिवाय तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहू शकाल. (Give yourself time)

आभार मानायला शिका

आपल्यातील अनेक लोकांना आयुष्यातील नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याची सवय असते. परंतु, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आयुष्याच्या बाबतीत सकारात्मक राहा आणि कृतज्ञ व्हायला शिका. यासोबतच आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबाबत आभार माना.

दररोज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता, तेव्हा दिवसभरातील चांगल्या गोष्टी आठवा आणि त्यासाठी देवाचे आभार माना. यामुळे, तुमच्या मनातील असहाय्यतेची भावना दूर होऊन तुमच्या मनाला ऊर्जा मिळेल. (Learn to be thankful)

Mental Health
Mental Health : दिवसभरातील थकवा आणि ताण-तणाव दूर करण्यासाठी 'या' थेरपींची घ्या मदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com