Easy Hacks : कपड्यांच्या केअरशी संबंधित 5 सोप्या हॅक्स

अर्चना बनगे
Sunday, 7 March 2021

  कपडे रुबाबदार असावीत त्याचबरोबर ती आपल्याला सहजपणे सूट होणारी असावीत यासाठी आपण पाहिजे ती किंमत अनेक वेळा  मोजतो. मात्र 

कोल्हापूर : माणसाच्या जीवनातील मूलभूत तीन गरजांपैकी एक गरज म्हणजे वस्त्र होय.  कपडे रुबाबदार असावीत त्याचबरोबर ती आपल्याला सहजपणे सूट होणारी असावीत यासाठी आपण पाहिजे ती किंमत अनेक वेळा  मोजतो. मात्र असे कपडे  योग्य तऱ्हेने देखभाल  न केल्यास ते काही कालावधीतच जुने दिसू लागतात. कपड्यांची व्यवस्थित देखभाल कशा पद्धतीने करावे याबाबत टीप्स देणार आहोत.चला जाणून घेऊया सहज सोप्या गोष्टी ज्या आधारे आपले कपडे नेहमी नव्यासारखे दिसतील.

1) कपड्याचा रंग जाऊ नये याची काळजी घ्या..
जर तुम्हाला तुमचे कपडे जादा दिवस नव्यासारखे पाहिजे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपड्याचा रंग कमी होऊ नये याबाबत आपण लक्ष द्यावे. यासाठी तुम्ही पाण्यामध्ये मीठ किंवा शिरका  घालून कपडे  भिजवू शकता. असे केल्यामुळे कपड्यांना एक वेगळी चमक येते. त्याचबरोबर कपडे जास्त जास्त काळ उन्हामध्ये ठेवू नये. शक्यतो नेहमी ओले कपडे हँगरला अडकून सावली मध्येच त्याला वाळवावेत. अनेक वेळा महिला उन्हामध्ये कपडे वाळवण्याची गडबड करतात. यामुळेच अशा कपड्यावरील रंग उडून जातो.

2) हेअर स्ट्रेटनर च्या मदतीने कॉलर करा सरळ..
 अनेक वेळा आपण कपडे अडकल्यानंतर त्याचे कॉलर व्यवस्थित राहत नाही. अनेक वेळा इस्त्री केल्यानंतरही ते चांगले होत नाही. अशावेळी संपूर्ण मूड खराब होऊन जातो. जर तुमच्या शर्टची कॉलर खराब झाले असेल तर तुम्ही हेअर स्ट्रेटनर च्या मदतीने ते व्यवस्थित करू शकतात. शर्टच्या कॉलरचे मूळ यामुळे सहजपणे येऊ शकते. तसेच कॉलरचा कडकपणा मूळ स्वरूपात येतो.

3) कॉटनची कपडे आकसन्या पासून असा करा बचाव...
कॉटनची कपडे ज्यावेळी पहिल्यांदा धुतो  त्यावेळी ते थोडेसे आकसतात. असे झाल्यामुळे कपड्याचे फिटिंग खराब होऊन जातात. या स्थिती पासून वाचण्यासाठी आपण  डिटर्जंट पावडर  ऐवजी बेबी शाम्पू वापरू शकतो. यामुळे कपडे आखडणे पासून वाचतील. त्याचबरोबर त्याचा रंग ही जाणार नाही. जर तुम्ही कॉटन फॅब्रिक चा  ड्रेस टेलर कडे शिवण्यासाठी देत असाल तर तो एक वेळ धूऊन व इस्त्री करूनच द्यावा. असे केल्यामुळे नवीन कपडे पहिल्यांदा धूत असताना आखडणार नाहीत.

4) रेजर ने करा कपड्याचे पिलिंग
काही वेळा नवीन कपडे एक-दोन वेळा वापरल्यानंतर जुन्या सारखे दिसू लागतात. तसेच यातून गुंज उठू लागतो.  जास्त करून उलन नायलॉन आणि कॉटन मिक्स नायलॉन सुतातील कपड्यांमध्ये असे प्रकार होतात .यावर थोडेसे ब्रशने घासले तरी तेथील कपड्याचे धागे तुटतात. तसेच ठिकठिकाणी आणखीन गुंज उठू लागते. ज्या ठिकाणी अशाप्रकारे धागे असतील त्या ठिकाणी आपण रेजर चा उपयोग करून उठलेले गुंज आणि धागे काढू शकतो. यामुळे आपले कपडे नव्यासारखे दिसतील.

5)कपड्यावरील रिंकल्स अशाप्रकारे कमी करा 
कॉटन आणि सिल्क फॅब्रिक मधील कपड्या ची सर्वात मोठी समस्या म्हणजे कपडे लवकर चूरघळतात. यामुळे असे घातलेले कपडे जुन्या सारखे वाटू लागतात. आपण प्रत्येक वेळी ही कपडे इस्त्री करू शकत नाही खासकरून गडबडीने जाणार असतो तेव्हा हे  अशक्य असते. अशावेळी आपण कपड्यांना हँगर वरती अडकवा आणि त्यावर स्प्रे बॉटल च्या मदतीने ज्या ठिकाणी कपडे चुरगळलेले असतील तिथे पाण्याचा फवारा मारा. त्यानंतर तुम्ही हेअर ड्रायरचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे चुरगळलेले कपडे सहजपणे व्यवस्थित होतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Easy Hacks 5 easy hacks related to clothing care lifestyle tips marathi news