
कोल्हापूर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. यामुळे साफसफाईपासुन ते खाण्यापिण्यापर्यंत काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या मौसमात शरीराला घामामुळे वास येण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे आपण खूप त्रस्त असतो. इतकेच नाही तर काही लोकांना रात्री झोपतानाही घाम येतो. परिणामी आपल्या अंथरुणालाही त्याचा वास येऊ शकतो. त्यामुळे आपण त्याचा वापर करणे टाळतो. यामध्ये र्जम्स आणि बॅक्टेरियाही असू शकतात. ज्यामुळे आपल्याला रैशच्या संभावनाही येऊ शकतात. बऱ्याच वेळा बेडशीट आणि उशीला डिटर्जंटमध्ये स्वच्छ करुनही त्यातून वास येत असतो. असे पांघरून वापरल्यास झोप लागत नाही. त्यामुळे तुम्ही या काही उपायांचा वापर करू शकता..
विनेगर वापरा, बॅक्टेरिया हटवा
व्हाइट व्हिनेगरमध्ये ऍसिडीकचे गुण असतात. बॅक्टेरियापासून दूर करण्यासाठी बादलीत अर्ध्यापर्यंत गरम पाणी घेऊन त्यात थंड पाणी घालाव. या कोमट पाण्यात व्हाइट व्हिनेगर घालावे. या मिश्रणात बेडशीट किंवा उशी कव्हर दोन तासांसाठी भिजत घालावे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणार असाल तर त्यात वाईट सिल्का मिक्स करावा. जर कवर किंवा बेडशीटला विनेगरचा गंध येत असेल तर ते डिटर्जेंटच्या पाण्यात घालावे.
हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे चमक वाढते
विनेगर आणि सोक केल्यानंतर आता त्याला वॉशिंग मशीनमध्ये गरम पाणी आणि डिटर्जेंट मिक्स करा. तुम्ही वाटलं तर यामध्ये अर्धा कप हायड्रोजन पेरॉक्साइडही घालू शकता. कपड्यावरचे डाग धब्बे दूर करण्यासाठी आणि कपड्याची चमक वाढवण्यासाठी हे मदत करते. बेडशीट धुतल्यानंतर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये फक्त एकावेळी एकच उशी धुण्यासाठी टाका.
ऊन दाखवणेही गरजेचे आहे
विनेगर आणि डिटर्जंटने साफ केल्यानंतर ही बेडशीटमधून वास येत असेल तर त्याला सूर्याच्या किरणांना सुकण्यासाठी ठेवा. वॉशिंग मशीनमध्ये घेतल्यानंतर त्यांना सूर्याची किरणे मिळणं गरजेचे असते. त्यामुळे यात ओलेपणा राहणार नाही. हा वास आणि जर्म्स दूर करण्यासाठी बेडशीट किंवा उशीला उत्तमप्रकारे सुकु देणे उन्हात वाळवणे गरजेचे असते. त्याच पद्धतीने इतर कपड्यांनाही उन्हात वाळवल्यामुळे बॅक्टेरिया मरून जातो.
इसेन्शियल ऑईलचा उपयोग
बेडशीट, उशींना वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर करत असाल तर यामध्ये लव्हेंडर कलर इसेन्शियल ऑईल मिक्स करा. त्वचेऐवजी याचा साफसफाई करण्यासाठी हे उपयोगी आहे, असे मानले जाते. यासाठी पाच ते सहा थेंब लेवेंडर इसेन्शियल ऑईल बेडशीटवर शिंपडल्याने ड्रायर करू शकता. परंतु नॉर्मल टेंपरेचरवर हा ड्रायर वापरा. लव्हेंडर ऑईलचा वापर डोकं शांत करण्यासाठी होतो तसेच त्याच्या सुगंधाने झोपही चांगली लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.