esakal | उन्हाळ्यात हेअरस्टाईल खराब होते का? वापरा या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

easy tips for women to holding her hairstyle for long lasting in kolhapur

अशा काही खास टिप्स आहेत ज्या बराच वेळ तुमची हेअरस्टाईल उत्तम ठेवू शकतात. चला तर मग त्या टिप्स पाहूया...

उन्हाळ्यात हेअरस्टाईल खराब होते का? वापरा या टिप्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गरमीच्या दिवसात हेअर स्टाईल करणे थोडे कठीण होते. केसांना स्ट्रेट करणे, कलर करणे यासाठी वेळ खर्च करावा लागतो. परंतु काही वेळातच तुमचे केस कलर केल्याने खुलुन दिसतात. परंतु गरमीमुळे हेअर स्टाईल काही काळासाठी छान दिसते. तुम्ही घराबाहेर पडेपर्यंत, कार्यक्रमाला जाईपर्यंत ही हेअर स्टाईल छान दिसते. परंतु काही काळाने हा लुक बदलतो. आणि ते सावरणे कठीण होऊन जाते. अशा वेळी महिलांना समजून येत नाही की हेअर स्टाइल होल्ड करण्यासाठी काय करायला हवे. साधारणत: हेअरस्टाईल बिघडते त्यावेळी पूर्ण लूक खराब होतो. आपण यामुळे त्रस्त होतो. यासाठी अशा काही खास टिप्स आहेत ज्या बराच वेळ तुमची हेअरस्टाईल उत्तम ठेवू शकतात. चला तर मग त्या टिप्स पाहूया...

केसांना तयार करा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हेअर स्टाईल लॉंगलास्ट पर्यंत तयार करू शकता. यासाठी पहिली स्टेप आहे की तुम्ही केस शॅम्पूने स्वच्छ करा. जर तुमच्या लूकसाठी तुम्ही स्ट्रेट केसासह सिल्की लूक हवा असल्यास शॅम्पूने केस धुऊन घ्या. आणि केस कुरळे हवे असल्यास त्याच पद्धतीचा शॅम्पू तुम्ही वापरू शकता.

हेअर सीरमचा वापर करा 

ही खूप सोपी स्टेप आहे. परंतु यामुळे तुमची हेअर स्टाईल लॉंग लास्टींगपर्यंत जाऊ शकते. साधारणतः केस धुतल्यानंतर हेअर सीरमचा वापर करावा, असं सुचवलं जातं. परंतु तुम्ही तुमच्या केसांच्या स्टाईलप्रमाणे त्याची मात्रा कमी जास्त करु शकता. यामुळे केसांची उत्तम निगा तर राहतेच. तसेच हेअर स्टाईल फोल्ड करण्यासाठीही उपयोगी पडते. परंतु ही मात्रा चुकल्यास केसांना नुकसानही पोहोचते.

ड्राय शॅम्पूची मदत घ्या

साधारणतः ड्राय शाम्पू हा प्रत्येक तरुणीच्या हेअर किटमध्ये असतोच. ड्राय शॅम्पू हा फक्त अतिरिक्त केस साफ करतो असे नाही तर तो घामही कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हेअर स्टाईल लॉंग लास्टिक बनण्यासाठी ड्राय शॅम्पू काम करतो. फक्त तुम्हाला स्टाईल केलेल्या केसांवर ड्राय शॅम्पूचा शिडकावा करावा लागेल. हा घामापासून दूर ठेवेल आणि हेअरस्टाईल खराब होण्यापासून मदत होईल.

सेटिंग स्प्रेचा वापर करा

ही एक सोपी ट्रिक आहे. जी तुमची हेअरस्टाईल होल्ड करण्यास मदत करते. यामुळे तुमची हेअर स्टाईल पूर्ण केल्यानंतर सेटिंग स्प्रेचा हलकासा वापर करा. यामुळे तुमच्या केसांची चमक तर वाढतेच पण ते शाईनही दिसतात. 

loading image