esakal | आहारात करा ५ पदार्थांचा समावेश; होणार नाहीत लशीचे साईड इफेक्ट्स

बोलून बातमी शोधा

आहारात करा ५ पदार्थांचा समावेश; होणार नाहीत लशीचे साईड इफेक्ट्स
आहारात करा ५ पदार्थांचा समावेश; होणार नाहीत लशीचे साईड इफेक्ट्स
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहेत. यात अनेकदा लसीकरण झाल्यानंतर काहींना साईड इफेक्ट्सचादेखील सामना करावा लागत आहे. आता बऱ्याच वेळा ताप येणे, अंगदुखी अशा समस्या निर्माण होत आहेत. परंतु, हे साईड इफेक्ट्स टाळायचे असतील तर आहारात काही महत्त्वाच्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. याविषयी हॉर्वर्ड न्युट्रिशिअन मनोचिकित्सक डॉ. उमा नायडू यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

१. हिरव्या भाज्या -

डॉ. नायडू यांच्या मतानुसार, हिरव्या पालेभाज्या खाणं शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे व्हॅक्सिन घेतल्यानंतरही आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. यात पालक, ब्रोकोली या भाज्यांचा समावेश व्हावा. यात मोठ्या प्रमाणावर अॅटीऑक्सिटेंड्स असतात. ज्यामुळे शरीरावरी सूजदेखील कमी होते.

२. सूप -

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा उत्तम पदार्थ म्हणजे सूप. सूपाच्या माध्यमातून शरीरातील पाण्याची कमतरतादेखील दूर होते. तसंच शरीरात ताकद येते.

३. कांदा व लसूण -

कांदा व लसूण यांच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. तसंच कांद्यामध्ये फायबरदेखील असतं.त्यामुळे हे पदार्थ शरीरासाठी फायदेशीर आहेत.

४. हळद -

कोणत्याही जखमेवर गुणकारी ठरणारी हळद व्हॅक्सिन घेतल्यावर फायदेशीर ठरते. हळदीमुळे शरीरावरील सूज कमी होते. तसंच ताणदेखील कमी होतो.

५. ब्लुबेरी -

ब्लुबेरी ही अॅटी इंफ्लेमेटरी पदार्थांपैकी एक मानली जाते. तिच्यामुळे शरीरात सेरोटोनिनची मात्रा वाढते. ब्लूबेरी में अॅटी-ऑक्सिडेंट म्हणूनही काम करते.