घराला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी काही खास सोपे उपाय तुम्हाला माहित आहेत का?

eco friendly house how to prepare the tips for people in kolhapur
eco friendly house how to prepare the tips for people in kolhapur

कोल्हापूर : पर्यावरण वाचवण्यासाठी आपण पहिल्यापेक्षा जास्त सावध झालो आहोत. प्लास्टिक पिशव्यांऐवजी आपण कागदी, कापडी पिशव्यांचा वापर करत आहोत. याचसारखे छोटे छोटे पर्याय, परंतु पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलत आहोत. त्याचबरोबर आपली जीवनशैली आणखी पर्यावरणपूरक व्हावी असे सर्वांना वाटते. तर या प्रक्रियेमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. इथे आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही घराला इकॉफ्रेन्डली बनवू शकता आणि तुमची तब्येत, सुदंरता राखून ठेवण्यासाठी तुम्ही चांगल्या दिशेने पाऊल  टाकाल.

जास्त गतीने आणि वातावरणामध्ये गरमी निर्माण बल्ब मध्ये बदल :

आपल्याला पर्यावरणपुरक जीवनशैलीचे अनुसरण करायचे असल्यास आपण खूप सोप्या पद्धतीने ते करू शकतो. जास्त जळणारे आणि जास्त गरमी निर्माण होणारे बलाना सीएफएल पेक्षा एलईडी बल्बचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्ही ऊर्जेची बचत करू शकता. त्याचबरोबर ह्या बल्बचा प्रकाश डोळ्यांसाठी चांगला आणि शांतता देणारा असतो.

इलेट्रॉनिक उपकरणांचा प्लग काढणे :

टीव्ही बंद केल्यामुळे इलेक्ट्रीसिटीची बचत होणार नाही, जोपर्यंत तुम्ही टीव्हीचे प्लग सॉकेट आहे. तोपर्यंत ऊर्जेची देवाण - घेवाण चालूच असते. त्यामुळे टीव्ही बंद केल्यानंतर प्लग पण काढून ठेवावा. टीव्ही, लॅपटॉप यांसारखे उपकरणे स्टँडबाय मोडवर ठेवावे. सॉकेटमधून प्लग काढून ठेवल्यामुळे आपण वापर केलेल्या ऊर्जेचे 15 % उर्जेमध्ये घट होऊ शकते. मायक्रोव्हेव ओव्हन, इलेकट्रिक डिव्हाइसचे स्विच बंद करुन त्यासोबत अनप्लग करून, प्लग काढून ठेवावे.

फ्रीज सावली मध्ये ठेवावा :
    
तुमच्या फ्रीजला उन्हाच्या किरणांपासून दूर ठेवा. कारण फ्रीजवर जर ऊन येत असेल तर आतील तापमान आहे तसे राखून ठेवण्यास जास्त ऊर्जा लागते. फ्रीज उघडण्यासाठी आतमध्ये जे साहित्य ठेवणार आहात ते आधीच तयार ठेवा कारण सारखे सारखे फ्रीज उघडावा लागणार नाही. सारखे फ्रीज उघडल्याने तुमचं बिल जास्ती येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर फ्रीज आणि दरवाजा यामधे 7.6 सेमीचे सुरक्षित अंतर ठेवा. त्यामुळे फ्रीजमध्ये खुली हवा राहण्यास मदत होते.

नळ बंद करणे :
     
आपल्याला ब्रश करताना नळ खुले ठेवण्याचे सवय असते. परंतु ही सवय पाण्याचे वायफळ खर्च करते. जेव्हा आपल्याला गरज आहे तेंव्हाच पाण्याचे नळ चालू करा आणि आपल्याला गरज नसताना पाण्याचे नळ बंद ठेवा. नळ जर लिकेज असेल, आणि नळातून थेंब-थेंब पाणी टपकत असेल तर ते दुरुस्त करून घ्यावे. 1 अंकाप्रमाणे जर पाणी टपकत असेल तर पूर्ण वर्षभरात 182 लिटर पाणी वायफळ खर्च होते. रेजर धुण्यासाठी नळाचे पाणी चालू न करता 1 कपमध्ये पाणी जपून पाण्याचा वापर करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com