Egg Versus Milk : अंडी की दूध कशात असतं जास्त प्रोटीन?

अंडी किंवा दूध, कशात असतात सर्वात जास्त प्रथिने
Egg Versus Milk
Egg Versus Milk esakal

Egg Versus Milk : जगात दोन प्रकारचे खवय्ये लोक असतात. एक म्हणजे व्हेज खाणारे आणि नॉनव्हेजचे शौकीन असलेले. प्रत्येक घरात एखादा व्यक्तीतरी शाहाकारी असतोच. तो नेहमी शाकाहाराबद्दल सांगतो, तर मासांहार करणारे लोक मासांहारी पदार्थच कसे चांगले हे सांगतात.

या शाकाहार-मांसाहारामुळे अंडी कि दूध?, कशात असतं जास्त कॅल्शिअम यामुळेही घरात वाद होतात. काही लोक तर दोन्ही खायला सांगतात. जिम करणारे तरूण अंडी आणि दूध दोन्हीही खातात. या जगात दोन प्रकारची लोकं असतात. एक असतात जी अंडी आणि दूध एकत्र खाणे चांगले मानतात.

तर दुसरा प्रकार त्या लोकांचा असतो ज्यांना अंडी आणि दूध एकत्र खाणे वाईट वाटते आणि त्यामुळे शारीरिक आजार होण्याची भीती असते. मात्र संशोधक आणि जाणकारांच्या मते अंडी आणि दूध यांचे एकत्र सेवन लाभदायक असते व त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. (Egg Versus Milk :  Eggs or milk, which has the most protein? Know how many benefits of whom)

Egg Versus Milk
Egg Roll : सकाळी नाश्त्यात अंडा रोल खा अन् दिवसभर एनर्जेटीक रहा

असे बरेच पोषक तत्व आहेत जे फक्त अंडी आणि दुधात आढळतात. जसे की कॅल्शियम आणि ओमेगा-३. केवळ ही जीवनसत्त्वेच नाही तर असे अनेक पोषक घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी पुरक आहेत.

अंडी की दूध यातील बेस्ट काय आहे. आणि ते निरोगी का आहे? कशात जास्त प्रोटीन आहे. चला, अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.(Milk)

अंडी किंवा दूध, कशात असतात सर्वात जास्त प्रथिने

50 ग्रॅम वजन असलेल्या 1 अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात. तर, 100 ग्रॅम दुधात 3.4 ग्रॅम प्रथिने असतात. या दृष्टिकोनातून अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

त्यामुळे जर तुम्हाला तुमचे केस निरोगी ठेवायचे असतील, तुमची हाडे मजबूत बनवायची असतील आणि तुमचे हार्मोनल आरोग्य सुधारायचे असेल तर तुम्ही प्रथिनेयुक्त अंडी खाणे आवश्यक आहे. पण, जर तुम्ही अंडी खात नसाल तर दूध नक्की प्या. (Egg Recipe)

Egg Versus Milk
Raw Egg Side Effects : कच्चे अंडे खाण्याचं नवं फॅड आलंय? त्याचे तोटेही जाणून घ्या, मग निर्णय घ्या! 

अंड्यात किती पोषक तत्वे असतात

अंडे लहान दिसत असले तरी ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. अंड्यामध्ये प्रथिने, संतृप्त चरबी तसेच काही खनिजे, जीवनसत्त्वे, कॅरोटीनोइड्स आणि लोह असते. त्यामध्ये व्हिटॅमिन डी, ई, के, बी6, कॅल्शियम आणि झिंक चांगल्या प्रमाणात असतात.

आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक दुधात असतात. हे प्रथिने, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम, सेलेनियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के 2 चा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे सर्व पोषक घटकांसाठी दररोज एक ग्लास दूध प्या. (Milk Benefits)

तुम्ही दूध आणि अंडी दोन्ही एकत्र घेऊ शकता. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे रोज 1 ग्लास दुधात 1 तुटलेले अंडे मिसळा आणि नंतर हे दूध प्या. तसेच, तुम्ही तुमच्या आहारात दूध आणि अंड्याचा स्वतंत्रपणे समावेश करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com