esakal | उन्हामुळे बेजार झालेल्या हत्तीची धम्माल; बाथटबमध्ये करतोय अंघोळ

बोलून बातमी शोधा

उन्हामुळे बेजार झालेल्या हत्तीची धम्माल; बाथटबमध्ये करतोय अंघोळ

हत्तीची मस्ती पाहून अनेक जण त्याच्या प्रेमात पडले आहेत

उन्हामुळे बेजार झालेल्या हत्तीची धम्माल; बाथटबमध्ये करतोय अंघोळ
sakal_logo
By
शर्वरी जोशी

असह्य करणारा ऋतू म्हणजे उन्हाळा. एप्रिल महिन्याला सुरुवात झाली की वातावरणातील बदल हळूहळू जाणवायला लागतात. हवेतील उष्णता तीव्रतेने वाढायला लागते. त्यामुळे प्रत्येक जण या उष्णतेमुळे बेजार होऊन जातो. केवळ व्यक्तीच नव्हे तर प्राण्यांनादेखील या उष्णतेची झळ जाणवते. अनेकदा जंगलातील नद्यांचं पाणी अटतं, जंगलतोड केल्यामुळे प्राणी-पक्षांना मिळणारा विसावा हरवला जातो. त्यामुळे या ऋतूमध्ये प्राणी व पक्ष्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यामध्येच सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही झाल्यामुळे हे पिल्लू मस्तीपैकी बाथटबमध्ये पडून पाण्यात डुबकी घेत आहे.

आतापर्यंत सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्येच या हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ लोकप्रिय ठरत आहे. उन्हामुळे अंगाची झालेली लाहीलाही कमी करण्यासाठी हा हत्ती थेट बाथटबमध्ये गेला आणि त्या पाण्यात मस्तपैकी पहुडायला लागला. विशेष म्हणजे या बाथटबमध्ये खेळतांना त्यांच्या बाललीला पाहून अनेक जण त्याच्या प्रेमात पडले आहेत.

सोशल मीडियावर चर्चेत आलेला व्हिडीओ वनविभागाचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. पाहा,उन्हापासून वाचण्यासाठी आईसमोर कोण पाण्यात चिल करतंय, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : बटाट्याचं शास्त्रीय नाव काय? SSC CHSL परिक्षेतील सहा रंजक प्रश्न

दरम्यान, हा व्हिडीओ तुफान लोकप्रिय होत असून आतापर्यंत त्याला १२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर, असंख्य लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.