

शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
ईक्यू म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता. ही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. जसा आपल्या प्रत्येकाचा एक नैसर्गिक आयक्यू असतो; तशीच आपल्या प्रत्येकामध्ये भावनिक बुद्धिमत्ताही असते. फरक एवढाच, की आपल्या प्रत्येकाची ईक्यूची रेंज, पातळीही वेगळी असते. आपल्या भावनिक बुद्धिमत्तेचा थेट प्रभाव आपल्या स्वभावावर, आपल्या विचारांवर, आपल्या नात्यांवर, आपल्या कार्यक्षमतेवर, आपल्या स्वास्थ्यावर, अशा आयुष्यातल्या सर्व महत्त्वाच्या घटकांवर निश्चितच होत असतो.