Shivani Bavkarsakal
लाइफस्टाइल
मोहवणारी शब्दांची दुनिया
रोजचे आमचे शूटिंग साधारण बारा-चौदा तास सुरू असते. त्यातही मी मेकअप रूममध्ये माझा वाचनाचा छंद जोपासते.
मला वाचन करायला खूप आवडते. त्यामुळे कितीही कामाचा ताण असो तो जाणवत नाही. एकदा का वाचनाची सवय लागली की इतर कोणत्याही गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरत नाहीत. लहानपणापासूनच मला वाचनाचा छंद आहे. ही आवड मी रोज जपत असते आणि ती वाढविण्याचा प्रयत्नही करीत असते.