वाढत्या तापमानावर ‘ग्रीन बिल्डिंग’ चळवळ गरजेची ,पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता

Green Building: शहरांचे वाढते तापमान कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंगची चळवळ वाढविणे गरजेचे आहे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले आहे.
Green Building
Green Building Sakal

Green Building: वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ग्रीन बिल्डिंगची चर्चा काही वर्षांपासून जोर धरत आहे. पण, अद्याप शासनस्तरावर याविषयीचे धोरण अंतिम झालेले नाही. असे असले तरी शहरांचे वाढते तापमान कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंगची चळवळ वाढविणे गरजेचे आहे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून व कमीत-कमी विजेचा वापर व्हावा, अशा म्हणजेच ग्रीन बिल्डिंगची उभारणी केल्यास वाढत्या तापमानाला आळा बसणार आहे. महापालिकेचे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ग्रीन बिल्डिंगचा विषय शहरात चर्चेला आणला. कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचा नवा सोर्स तयार होईल, असे सूतोवाच त्यांनी केले होते.

Green Building
Cold Water: उन्हाळ्यात अतिथंड पाणी, बर्फाचे सेवन घातक

मात्र, तो विषय मागे पडला आहे. यासंदर्भात प्रयास फाउंडेशनचे रवी चौधरी म्हणाले, ‘‘ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना हळूहळू जोर धरत आहे. वाढते तापमान रोखण्यासाठी अशा इमारती जास्तीत-जास्त उभ्या राहणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून कमीत-कमी लाइटचा वापर होईल, अशा पद्धतीने उभारलेल्या बिल्डिंग म्हणजे ग्रीन बिल्डिंग. सध्याचा विचार करता ही प्रक्रिया महागडी असली तरी भविष्याचा विचार करता ग्रीन बिल्डिंग ही एक प्रकारची चळवळ झाली पाहिजे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com