ब्रेकअप झाले त्याच्या सोबत काम करण्याची वेळ आली तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ex girlfriend and boyfriend in same office

जोडीदारासोबत ब्रेकअप झालं की त्याच्यापासून अंतर ठेवायला अनेकांना आवडतं.

ब्रेकअप झाले त्याच्या सोबत काम करण्याची वेळ आली तर...

जोडीदारासोबत ब्रेकअप झालं की त्याच्यापासून अंतर ठेवायला अनेकांना आवडतं. त्याच्याशी संबंधित सर्व चॅट्स, मेसेजेस आणि फोटो ते डिलीट करतात, जेणेकरून एक्सपासूनचं अंतर राखलं जाईल आणि ते विसरणं सोपं जाईल. पण आयुष्यात अनेक वेळा जुन्या जोडीदाराला सामोरं जावं लागतं, अशा परिस्थितीत अनेकजणांना ही परिस्थिती हाताळता येत नाही.

हेही वाचा: ब्रेकअप के बाद... मुली काय करतात माहितेय?

ऑफिसमध्ये एक्सशी कसे वागावे-

बऱ्याच वेळा आयुष्य अशा एका टप्प्यावर आणते जेव्हा आपल्याला त्याच ऑफिसमध्ये (Office) आपल्या एक्सबरोबर काम करावे लागते कारण जुन्या जोडीदाराचे जॉयनिंग अचानक आपल्या ऑफिसमध्ये होते. तुम्हाला अशी समस्या असेल तर परिस्थिती कशी हाताळायची?

ऑफिसमध्ये जुन्या रिलेशनशिपबद्दल कळू देऊ नका-

जर इतर लोकांना या नात्याबद्दल (Relationship) माहिती नसेल, तर ते गुपित राहू देणंच योग्य ठरेल. ऑफिसमधल्या बाकीच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली तर विनाकारण गप्पांचा विषय व्हाल. जुनं नातं जितकं सिक्रेट असेल तितकं चांगलं.

हेही वाचा: ब्रेकअप ऐवजी ब्रेक घ्या; नात्याला वेळ द्या!

आव्हानापासून दूर पळू नका-

ऑफिसमध्ये एक्सचा सामना करायचा असेल तर या आव्हानापासून पळ काढू नका, तर आरामात सामोरे जा. शक्य तितक्या सामान्यपणे वागण्याचा प्रयत्न करणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. म्हणजे यापूर्वी काहीही झालेलं नाही, असा शो करा.

जुन्या गोष्टी काढू नका-

तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे एकमेकांच्या खासगी गोष्टी तुम्हाला माहीत असतीलच, पण जुन्या गोष्टींना कधीही डिस्कस करू नका, असं केल्याने दोघांचीही जुनी जखम हिरवीगार होईल.

हेही वाचा: मैरे सैयाजी आज मैने ब्रेकअप कर लिया, पण का? अखेर नातं का तुटतं?

सोबत काम न करण्याचा प्रयत्न करा-

तुमच्या दोघांनाही एखाद्या प्रोजेक्ट किंवा टीममध्ये ठेवले असल्यास, सेम ऑफिसमध्ये दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला अधिक कम्युनिकेट करावे लागेल आणि अनावश्यकपणे सामोरे जाणे टाळावे लागेल.

एक्सेसची खिल्ली उडवू नका-

जर तुमचा एक्स तुमची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते हसण्यावर घालवा. अशा विनोदाकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे कारण रागावल्यामुळे गोष्टी आणखी खराब होऊ शकतात.

Web Title: Ex Girlfriend And Boyfriend In Same Office How To Handle Such Situation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top