तरुणांचा जास्त प्रोटीन खाण्याचा ट्रेंड महागात; अति प्रोटीन खाल्ल्याने खराब होते का किडनी?  जाणून घ्या वयानुसार योग्य प्रमाण...

Protein: फिटनेस आणि जिमच्या क्रेझमध्ये अनेक तरुण कोणतीही माहिती न घेता प्रोटीनचे मोठे डोस घेतात. प्रोटीन पावडरचे जास्त डोस किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरू शकतात..जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला!
Too Much Protein Causes Kidney Damage Symptoms & Dosage Guide

Too Much Protein Causes Kidney Damage? Symptoms & Dosage Guide

esakal 

Updated on: 

Protein Supplements and Kidney Risk: आजच्या तरुणाईमध्ये फिटनेस, जिम आणि बॉडीबिल्डिंगची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. आकर्षक शरीरयष्टी बनवण्यासाठी, स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि व्यायामानंतरची झीज भरून काढण्यासाठी 'प्रोटीन सप्लीमेंट्स' (Protein supplements) किंवा प्रोटीन पावडरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात शरीराला आवश्यक पोषण वेगाने मिळवण्यासाठी हा सोपा मार्ग मानला जातो. पण, याच फिटनेसच्या नादात सध्या एक गंभीर धोका निर्माण झाला आहे, तो म्हणजे प्रथिनांचे प्रमाणाबाहेर आणि अतिसेवन!

कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा स्वतःच्या शरीराची गरज न ओळखता रोजच्या रोज प्रोटीनचे मोठे डोस घेणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. आंधळेपणाने होणाऱ्या या अतिसेवनाचा थेट आणि घातक फटका आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवाला, म्हणजेच मूत्रपिंडाला (किडनी) बसू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com