Facial Wipes: चेहऱ्यासाठी फेशियल वाईप्स वापरणे आजकाल ट्रेंड बनला आहे. घराबाहेर जाताना अनेक महिला फेशियल वाईप्स सोबत ठेवतात. तसेच मेकअप काढण्यासाठी देखील फेशियल वाईप्सचा वापर केला जातो. पण वेट वाईप्सचा अतिवापर करणे त्वचेसाठी घातक ठरू शकतो. .कोरोना महामारीपासून अनेक लोक स्वच्छतेबाबत अधिक जागरूक झाले आहेत. यामुळे लोक वेट वाईप्स चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. आजकाल शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे वेट वाईप्स असतात.जर तुम्ही फेशियल वाइप्सचा जास्त वापर करत असाल तर ते तुमच्या त्वचेसाठी चांगले नाही. कारण यामुळे तुमच्या त्वचेवर टॅन होऊ शकते आणि काही त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. कारण त्यात असलेली रसायने त्वचेसाठी अतिशय घातक असतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम देखील येऊ शकतात..Makeup Tips For First Anniversary: लग्नाचा पहिला वाढदिवस होईल स्मरणीय, फक्त अशी करा तयारी .बाजारात विविध प्रकारचे फेशियल वाइप ब्रँड उपलब्ध आहेत. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी त्यांची कार्यक्षमता आणि उपयुक्तता तपासणे महत्त्वाचे असते. सर्व उत्पादने समान तयार केली जात नाहीत; काहींमध्ये कठोर रसायने किंवा ऍलर्जिन असू शकतात. ज्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. पॅकेजिंगच्या मागील बाजूस असलेल्या घटकांची यादी पाहून बरेच काही शिकता येते.वेट वाईप्स खरेदी करताना विविध घटक आणि घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. ज्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो. यामुळे चेहऱ्यासाठी वेट वाइप्स निवडताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा. .ज्या वाइपमध्ये कोरफड, हायलूरोनिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन सी सारखे हायड्रेटिंग घटक असतील तेच वापरावे. त्यामध्ये कमीतकमी परफ्यूम असणे आवश्यक आहे, कारण जास्त सुगंध त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. परफ्यूममध्ये असलेले अल्कोहोल त्वचेवर राहू शकते आणि त्यावर क्रीम लावल्याने त्वचेला आणखी जळजळ होऊ शकते..दैनंदिन स्किनकेअर रूटीनमध्ये कमी रसायनिक प्रोडक्टचा वापर करणे गरजेचे आहे. अनेक महिला मेकअप काढण्यासाठी क्लिजिंग न वापरता वेट वाईप्सचा वापर करतात. ज्यामुळे त्वचेला ईजा होऊ शकेत. डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.