Family Planning in India: कुटुंब नियोजनाचे ओझे ‘ती’च्याच खांद्यावर

Lack of male participation in family planning programs: कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही केवळ महिलांवरच पडते, पुरुषांचा सहभाग अद्यापही फारसा दिसत नाही.
Why do women bear the family planning burden in India
Why do women bear the family planning burden in Indiasakal
Updated on

Why do women bear the family planning burden in India: कुटुंब नियोजन हा विषय सामान्य बाब असला तरी आधुनिक युगातही ही शस्त्रक्रिया करून घेण्याची पुरुषांची मानसिक तयारी नसल्याचे समोर आले आहे. यामुळेच शहरात पुरुष नसबंदीची संख्या फक्त २३ तर वर्षभरात कुटुंब नियोजन करणाऱ्या महिलांची संख्या सव्वाचार हजारांच्या घरात आहे. सुशिक्षित समाजात कुटुंब नियोजनाचे ओझे ‘ती’च्याच खांद्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी शासन कुटुंब नियोजन राष्ट्रीय उपक्रम राबविते. पुरुष आणि स्त्री दोघांसाठी सेवा उपलब्ध आहे. मात्र यातही महिलाच आघाडीवर आहे. महानगरपालिका क्षेत्रात ५१ आरोग्य केंद्र (यूपीएससी), ७९ आरोग्य वर्धिनी केंद्र (यूएचडब्लूसी), त्यासोबतच तीन रुग्णालयात आहे. यापैकी केवळ एकाच रुग्णालयात शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. शहरात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या वर्षभरात ४ हजार ३८३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ज्यात केवळ २३ पुरुषांचा समावेश आहे.

Why do women bear the family planning burden in India
Male Birth Control Pill: काय सांगता? आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी? पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी

बिनटाक्याची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सुरू होऊनही ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांचे प्रमाण नगण्य, एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. आश्चर्य म्हणजे, पतीच्या नसबंदीला विरोध करून स्वत:ची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या स्त्रियांची संख्याही कमी नाही. या शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण मात्र फारच कमी आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती झाली. मात्र, त्यातून कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीने शस्त्रक्रिया करण्याचा दृष्टिकोन बहुतांश कुटुंबांचा असल्याचे समोर आले आहे.

  • शहरात ४,३६० महिलांवर शस्त्रक्रिया

  • फक्त २३ पुरुषांनी दाखवली हिम्मत

  • सुशिक्षित समाजातील वास्तव

पुरूष नसबंदी करणाऱ्यांची संख्या अल्प असली तरी जनजागृतीतून संख्या वाढत आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची शस्त्रक्रिया सोपी असल्याने कोणतेही नुकसान नाही. पसरलेले गैरसमज दूर सारून पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतली पाहिजे.

- दीपक सेलोकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी एमएनसी, नागपूर

दहा मिनिटांची शस्त्रक्रिया, पण गैरसमज अधिक

पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया एक सर्वसामान्य १० मिनिटांची प्रक्रिया आहे. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवसापासून दिनचर्येप्रमाणे नियमित कामे करता येतात. मात्र, पुरुषी अहंकार, पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल असलेले गैरसमज, आणि पुढील लैंगिक आयुष्याबद्दलची अकारण भीती, अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ आहेत. अवजड कामे करणाऱ्यांना केवळ ८-१० दिवस ही कामे न करण्याचा सल्ला दिला जातो. जड वजन उचलणे, धावणे, सायकलिंग, ओझे उचलणे यावर मर्यादा येतात. नंतर हळूहळू नियमितपणे रोजची कामे करू शकतात, असे सांगण्यात आले आहे.

Why do women bear the family planning burden in India
Infertility Prevention Tips: वंध्यत्व टाळण्यासाठी हवा समतोल आहार अन् व्यायाम

समाजमन बदलतेय

महिलांची नसबंदी करायची असल्यास किमान आठवड्याभरासाठी बेडरेस्ट दिला जातो. त्या तुलनेत पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया एका दिवसात केली जाते. शिवाय नियमित कामेही करता येतात. सुशिक्षित दांपत्यात सामंजस्य दाखवत पुरुषांकडून नसबंदीला प्राधान्य दिले जात आहे. ही संख्या अल्प असली तरी समाजमन बदलण्याचे संकेत असल्याचे एमएनसीच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com