Fashion: हिवाळ्यात हे 5 स्टायलिश ॲक्सेसरीज तुमच्या नॉर्मल लूकला एकदम स्टायलिश बनवतील

हिवाळा आला की, अनेकांना आपल्या स्टायलिश लूक ची काळजी वाटत असते, कारण थंडीने गारठायला होत
winter clothes
winter clothessakal

हिवाळा आला की, अनेकांना आपल्या स्टायलिश लूक ची काळजी वाटत असते, कारण थंडीने गारठायला होत आणि अनेक ड्रेसेस घालताच येत नाहीत अशा वेळेस आपल्या लूक आणि स्टाईल मध्ये अशा ॲक्सेसरीज ॲड करू शकतात.

हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी ॲक्सेसरीज

1. लेग वॉर्मर्स

लेग वॉर्मर्स केवळ थंडीपासून तुमचे संरक्षण करू शकत नाहीत तर तुमचा लुक स्टायलिश देखील करू शकतात. यासाठी, तुम्ही ब्लॅक लेग वॉर्मर घ्या. ते स्टाईलिश आणि मोहक दिसतात आणि तुम्ही ते शॉर्ट ड्रेसने स्टाईल करू शकता.

2. पोम-पोम हॅट

जर तुम्ही हिवाळ्यातील ॲक्सेसरीजमध्ये पाम पोम हॅट ॲड केली तर तुम्ही खूपच गोंडस दिसू शकता. तुम्ही ते स्वेटशर्ट, ट्राउझर्स आणि कोट किंवा जॅकेटसह देखील घालू शकता.

winter clothes
Beauty Tips : नखावर लवकर नेलपॉलिश वाळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या

3. रंगीत उबदार स्कार्फ

जर तुम्हाला स्कार्फ कॅरी करायला आवडत असेल तर या हिवाळ्यात रंगीबेरंगी उबदार स्कार्फ कॅरी करू शकता. हिवाळ्यासाठी हे सुपर कूल आणि सुपर क्युट अॅक्सेसरीज आहेत. हे रंगीबेरंगी लोकरीचे स्कार्फ डोळ्याला झटक्यात स्टायलिश दिसतील. तुम्ही ते कोणत्याही प्रकारचे जॅकेट, स्वेटर आणि ओव्हरकोटसोबत कॅरी करू शकता.

4. फ्लीस बूट

हिवाळ्याच्या मोसमात लेदरचे बूट नेहमीच ट्रेंडमध्ये असतात पण या वर्षी तुम्ही लोकरीचे किंवा फजी प्रकारचे फ्लीस बूट वापरल्यास ते तुमच्या स्टाइलला आणखी एका स्तरावर घेऊन जाईल. आजकाल अनेक सेलिब्रिटी फ्लीस बूट घालताना दिसतात.

5. स्टाईलिश विणलेले हातमोजे

तुमचे हात उबदार ठेवण्यासाठी तुम्ही हातमोजे वापरत असालच, पण जर तुम्हाला तुमची स्टाईल मस्त बनवायची असेल तर तुम्ही मऊ विणलेले हँड वॉर्मर हातमोजे घालू शकता. ते घातले तरीही तुम्ही मोबाईल, लॅपटॉपवर सहज काम करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com