दिसा स्टायलिश

मैत्रिणींनो, स्टायलिश दिसावं आणि आपली दखल प्रत्येकानं घ्यावी असं प्रत्येकीलाच वाटतं. फॅशनेबल, किंवा स्टायलिश दिसणं ही गोष्ट तुमच्याकडे असलेल्या पैशांवर अवलंबून नसते.
stylish
Stylishsakal

- पृथा वीर

मैत्रिणींनो, स्टायलिश दिसावं आणि आपली दखल प्रत्येकानं घ्यावी असं प्रत्येकीलाच वाटतं. फॅशनेबल, किंवा स्टायलिश दिसणं ही गोष्ट तुमच्याकडे असलेल्या पैशांवर अवलंबून नसते, तर तुम्ही तुमच्या निवडी कशा करता, एखादा साधाच ड्रेस छोट्या ॲक्सेसरीचा वापर करून कशा प्रकारे खुलवता, रंगांची निवड कशी करता, तो अटायर कशा प्रकारे कॅरी करता अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. चला आज आपण अशाच काही छोट्या टिप्स लक्षात घेऊ.

तुमचा पसंतिक्रम निश्चित करा

मैत्रिणींनो, साडी, ड्रेस, जीन्स, फॉर्मल वेअर, ट्रॅडिशनल वेअर, कुर्तीज, गाऊन्स, चुडीदार अशा किती तरी प्रकारांचा खजिना आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला यापैकी नक्की काय चांगलं दिसतं आणि तुम्हाला काय आवडतं हे निश्चित करा. उदाहरणार्थ, साडी नेसल्यावर खूप कॉंप्लिमेंट्स मिळतात, किंवा जीन्स परिधान केल्या, की आपल्यालाच कंफर्टेबल वाटतं, अशा गोष्टी मनात नोंदवून ठेवा आणि तेच स्टाइल स्टेटमेंट बनवा.

म्हणजे समजा साडी नेसल्यावर जास्त कॉंप्लिमेंट्स मिळत असतील आणि आपल्यालाही तो अटायर आवडत असेल, तर तेच तुमचं स्टाइल स्टेटमेंट बनवता येईल का, असा विचार करा. मग साड्यांमध्ये कोणते प्रकार आपल्याला जास्त सूट होतात, याचा विचार करा, इतरांचं निरीक्षण करा, थोडा अभ्यास करा, ॲक्सेसरीज कोणत्या सूट होतील हे ठरवा आणि त्यानुसार तुमचं समीकरण तयार करा.

प्रयोगशीलता महत्त्वाची

आपण परिधान करत असलेल्या पोशाखांमध्ये प्रयोगशीलता खूप महत्त्वाची. एकाच प्रकारचे किंवा रंगांचे ड्रेस किंवा प्रकार तुम्ही घालत राहिलात, तर ते मोनोटोनस होईल. त्यामुळे ट्रॅडिशनल आणि फॉर्मल यांचं मिक्स अँड मॅच करणं, एखादा पूर्वी कधीही न वापरलेला रंग ट्राय करून बघणं अशा गोष्टीही करा. प्रयोगशीलतेतून अनेक नव्या गोष्टी सापडतात. स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वाचा नवा सूर सापडू शकतो.

रंगांची निवड

तुमच्या कपड्यांचा प्रकार, त्यांचे पोत, दर्जा या गोष्टींइतकीच महत्त्वाची असते ती रंगांची निवड. त्यामुळे तुमची आवड, तुमची त्वचा, तुम्हाला आवडणाऱ्या ॲक्सेसरीज या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कपड्यांचे रंग निवडा. तुम्हाला कोणता रंग छान दिसतोय हे तुम्हाला बरोबर कळतंच.

अर्थात एक गोष्ट अशीही आहे, की पारंपरिक कल्पनांनुसारच रंगांची निवड करायला पाहिजे असं काहीही नाही. तुम्हाला एखादा रंग अतिशय मनापासून आवडत असेल, किंवा त्यात तुम्हाला जास्त आत्मविश्वास वाटत असेल, तर तो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. लक्षात ठेवायचं इतकंच, की जो कोणता रंग निवडाल तो तुम्ही सजगपणे निवडलेला असला पाहिजे.

ऐकावे जनाचे...

फॅशनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’. तुम्ही इतरांचं नक्की ऐका, त्यांच्या कॉमेंट्सबाबत विचारही करा; पण फक्त त्यावरच अवलंबून राहू नका. म्हणजे अमुक एक मैत्रीण म्हणाली, की ‘तुला छोटीच कानातली छान दिसतात’, तर तिच्या त्या कॉमेंटचं नक्कीच स्वागत करा; पण इतरही सात-आठ मैत्रिणींनाही विचारून बघा.

कदाचित त्या मैत्रिणीला स्वतःलाच छोटी कानातली आवडत असल्यामुळे तिचं ते वैयक्तिक मतही असू शकतं. तुम्हाला स्वतःला जर मोठी कानातली आवडत असतील तर? अर्थात जेन्युइन मतंही असू शकतात. एखाद्या जेन्युइन कॉमेंटनुसार बदल केल्यामुळे तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वात फरक पडू शकतो. त्यामुळे मत ऐका आणि तारतम्यानं निर्णय घ्या.

ॲक्सेसरीजचा वापर

मैत्रिणींनो, ॲक्सेसरीजचा वापर अतिशय महत्त्वाचा बरंका. दागिने, शूज, पर्स किंवा इतर गोष्टींची निवड खूप विचारपूर्वक करा. एखादा विचारपूर्वक खरेदी केलेला नेकलेस तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असा काही पाडतो की बासच! त्यामुळे ती गोष्ट कपड्यांइतकी महत्त्वाची हे नेहमी लक्षात ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com