फॅशनची खादी भ्रमंती

फॅशन ट्रेंड फॉलो करणं म्हणजे फक्त छान छान दिसणं नाही, तर आपली फॅशन आपली त्वचा आणि पर्यावरणपूरकच असावी याची काळजी घेणं हेही आहे.
Fashion of khadi material dress wearing vs styling
Fashion of khadi material dress wearing vs stylingSakal

- पृथा वीर

फॅशन ट्रेंड फॉलो करणं म्हणजे फक्त छान छान दिसणं नाही, तर आपली फॅशन आपली त्वचा आणि पर्यावरणपूरकच असावी याची काळजी घेणं हेही आहे. म्हणूनच उन्हाळ्यात खादी कॉटन ही बजेटमधली, जबाबदार फॅशन आहे. खादी कॉटनच्या ट्रेंडी साड्या ते खादीचे कुर्ते खूप सुंदर दिसतात आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडतात.

हातानं कातलेल्या सुतापासून, हातमागावर विणलेल्या सुती, लोकरी व रेशमी कापडाला ‘खादी’ किंवा ‘खद्दर’ म्हणतात. हातानं सूत काढणं आणि त्यापासून कापड विणण्याचा ग्रामोद्योग भारतात शतकानुशतकं चालत आलेला आहे.  कताई व विणकाम या दोन्ही बाबतींत तर भारतीय कारागिरांनी अतिशय कौशल्य संपादन केलं होतं. मधला काही काळ खादी मागं पडली असली, तरी ती आता पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आली आहे.

खादीचा आपला एक चाहता वर्ग आहे. हा भारतीय वस्त्र प्रकार सध्याही लोकप्रिय असून खादी कॉटनच्या तलम साड्या ट्रेंडमध्ये आहेत. पांढरा, राखाडी, नेव्ही ब्लू, टॅन, बॉटल ग्रीन हे रंग खूप सुंदर दिसतात. खादीचं आणखी एक महत्त्व म्हणजे हे स्किन-फ्रेंडली कापड आहे. त्यामुळे भारतीय वातावरणात अत्यंत योग्य ठरतं.

खादीचे निवडक प्रकार तर त्या-त्या राज्यांची वैशिष्ट्यं आहेत. आसामहून आलेले मुंगा कापड हे उच्च प्रतीचं रेशीम आहे, तर रॉ-सिल्कपासून बनणारं मटका कापड केवळ आसाममध्येच बनतं. छत्तीसगडची टस्सर रेशीम  साडी, पश्चिम बंगालची शुभ्र मसलीन खादी, बिहारची शुभ्र मसलीन दोसुती खादी साडी हे प्रकार लोकप्रिय आहेत. खादी कुर्ते खादी म्हणजे रफ अँड टफ प्रकार.

वापरणं आणि हाताळणं सोपं. जीन्सवर खादी कुर्ते छान दिसतात. उन्हाळ्याचे दिवस बघता स्ट्रेट कॉटन पँट, पलाझोही छान दिसतात. जीन्स, स्ट्रेट पँट, पलाझो हे पर्याय आलटून पालटून घातले, तर कंटाळा येणार नाही.

पलाझोसोबत लांब कुर्ती फॅशनेबल वाटतात. याउलट पलाझो आणि साध्या कुर्तीला पार्टी आउटफिटमध्ये बदलता येतं. मोकळे केस, साधी पोनी किंवा अंबाडा छान दिसतो. या ड्रेससोबत ऑक्सिडाइज्ड झुमके किंवा टेंम्पल स्टाइल कानातले खूप उठून दिसतात.

खादी साड्यांचे रंग उन्हाळ्याच्या अनुषंगानं योग्य आहेत. सौम्य रंग आणि त्यावर कॉंट्रास्ट रंगाचे प्लेन, पण डार्क रंगाचे ब्लाऊज ही परफेक्ट स्टाइल झाली आहे. वॉर्डरोबमध्ये काळा, लाल, हिरवा, निळा, केशरी, मोरपंखी, चॉकलेटी रंगाची ब्लाऊज असू द्या. हा मिक्स अँड मॅच ट्रेंड खादी कॉटनच्या साडीतलं सौंदर्य खुलवतो.

त्वचेची घ्या पुरेशी काळजी

स्टायलिश लूक म्हणजे महागडं फेशियल करणं असं नाही. तेजस्वी निरोगी त्वचा, स्वच्छ, चमकदार केस असले तरीही तुम्ही छानच दिसता. पुरेसं पाणी पिणं आणि जेवणाच्या वेळा सांभाळणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात तर स्वतःची काळजी घ्यायला हवीच. हलका व्यायाम, दररोज सकाळी एक वॉक आणि स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी सोबत पाण्याची बॉटल ठेवा. या पाण्यात सब्जा किंवा तुळशीचे पान घातलं तरीही छान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com