Fashion Tips : तरूणींना इंप्रेस करायचंय, मग आजच फॉलो करा या टीप्स

मुली प्रत्येक छोट्या गोष्टीचे निरीक्षण करतात. पर्सनॅलिटी आणि स्मार्टनेस तर आहेच पण यापेक्षाही बऱ्याच गोष्टी तरूणी ऑबझर्व करतात.
Fashion Tips
Fashion Tipsgoogle

पुणे : तरूणी इंप्रेस व्हाव्यात म्हणून तरूणांची धडपड सुरू असते. पण, योग्य गाईड न मिळाल्याने कशावर काहीही घालणं, केसांचा कोंबडा करणं, तो विचित्र पद्धतीने रंगवणं यासगळ्या गोष्टी तरूण मंडळी करतात आणि मुली भाव देत नाहीत म्हणून रडत बसतात.

गृपमध्ये कोणीतरी काही नवी स्टाईल केली की, लगेच त्याला कॉपी केलं जातं. पण, एखाद्याला कॉपी करण्याआधी ती स्टाईल तुमच्यावर चांगली दिसेल का ? याचाही विचार करायला हवा.

स्टाइलिंगला खास असा कोणताही नियम नाही. तुम्ही जी स्टाईल करता त्यात तुम्ही चांगले दिसणे महत्त्वाचे आहे. आपण केलेली फॅशन आपल्याला कॅरी करता आली पाहीजे. चला तर मग जाणून घेऊया त्या 10 टिप्स, ज्या वापरून तुम्ही तुमच्या स्टाईल भर घालू शकता.

ग्रूमिंग स्टाईल

तुम्ही किती चांगले कपडे घातले आहेत हे महत्त्वाचे नाही. जर तुमचे केस विस्कटलेले, नीट कापलेले नसतील, नखे वाढलेली असतील, दाढी वाढलेली असेल तर हा तूमच्या पर्सनॅलिटीचा मायनस पॉइंट समजला जातो. तूमचा फिटनेसही महत्त्वाचा आहे. कपड्यांना घामाचा वास येतोय का, कपडे स्वच्छ आहेत का या गोष्टींकडे लक्ष द्या.

मुली प्रत्येक छोट्या गोष्टीचे निरीक्षण करतात. पर्सनॅलिटी आणि स्मार्टनेस तर आहेच पण यापेक्षाही बऱ्याच गोष्टी तरूणी ऑबझर्व करतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या लूकमध्ये ग्लॅमर आणि स्मार्टनेस आणतात.

मॅचिंग शुज

कपड्यांवर मॅचिंग होणारे बूट तूमच्या पर्सनॅलिटीमध्ये भर घालतात. चांगले बूट तूम्हाला बेस्ट लुक देतात. त्यामुळे बूट निवडताना काळजी घ्या. ते घालताना योग्य त्या कपड्यावर घाला.

तुम्ही सूटावर स्पोर्ट्स शूज आणि कॅज्युअल वेअरसह क्लासिक फॉर्मल शूज घातले. तर ते किती विचित्र दिसेल. यासाठी प्रत्येक ड्रेससाठी वेगळे बूट घ्यायची गरज नाही. सर्व ड्रेसवर मॅच होतील असे ३ बूट घेतले तरी चालणार आहे.

एवरग्रीन व्हाइट टी शर्ट आणि जीन्स

व्हाइट शर्ट आणि जीन्स हे एक क्लासिक कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन कुठेही कधीही घालून जाता येणारे आणि तरूणींना आवडणारे आहे. मित्रांसोबत मजा करताना किंवा डेटवर जाताना हा ट्रेंडी लुक नक्की ट्राय करा.

जर तुम्ही पांढरा टी-शर्ट घातला असेल तर तो योग्य फिटींग असावा. खूप सैल आणि खूप घट्ट नको. जर तुमचे बायसेप्स आणि ट्रायसेप्स असतील तर त्यांना फ्लॉंट करायला अजिबात विसरू नका.

डेनिममध्ये लांब आणि स्लिम फिट जीन्सची फॅशन आहे. बाजारात जीन्समध्ये असंख्य व्हरायटी आहेत. जे तुम्ही तुमच्या शरीराच्या फिटनुसार निवडू शकता.

अट्रॅक्टीव सुट

सूटमध्ये तरूण सर्वात अट्रॅक्टीव दिसतात. पण, यासाठी तुम्ही नेहमी सूटमध्येच असणे गरज नाही. तुम्ही सूट घालाल तेव्हा तो परफेक्ट फिट असेल याची काळजी घ्या. सुट घालताना शोल्डर, स्लीव्ज परफेक्ट बसतील याकडे लक्ष द्या.

सुट बऱ्याच दिवसांनी घालणार असाल तर, तो आधी घालून बघा. त्यामुळे गोंधळ होणार नाही.

फोल्ड शोल्डर

फॉर्मल शर्टच्या बाह्या अर्ध्या फोल्ड करा आणि तूमच्या Forearmने शो ऑफ करा. ही स्टाईल तरूणींना अधिक आवडते. तूमच्यावर हा लुक कूल, कॅज्युअल वाटतो.

चिनोज आहे परफेक्ट

चिनोज हा फॉर्मल पॅन्टचा प्रकार असून तो तरूणांसाठी व्हर्सटाईल स्टाईल मानला जातो. तूम्हाला हवे असेल तर तूम्ही ही स्टाईल रोज करू शकता. तुमचे वॉर्डरॉब जर जिन्स आणि फॉर्मल पॅन्ट्सनी भरलेले असेल तर तूम्ही चिनोज ट्राय करू शकता. चिनोजचे फिटींग परफेक्ट असेल याची काळजी घ्या.

हेन्लीज शर्ट

जर तुमच्याकडे उत्तम बॉडी असेल तर हेन्लीज शर्ट तूमच्यासाठी आहे. पसंतीच्या बाबतीत हेन्लीज शर्ट एक पाऊल पुढे आहे. हेन्लीज तरूणींमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये अनेक रंग उपलब्ध आहेत, पण ग्रे, नेव्ही ब्लू, मिलिटरी ग्रीन असे न्यूट्रल रंग खूप चांगले दिसतात. त्यामुळे जर तुम्हाला टी-शर्टचा कंटाळा आला असेल तर हेन्लीज हा एक चांगला पर्याय आहे.

MANKLES

MANKLES म्हणजेच मॅन एंकल स्टाईल. ही हळुहळू पण नक्कीच तरुणांची पसंती बनत आहे. MANKLES स्टाईल कुल आणि कम्फरटेबल आहे. मुलांची ही स्टाईल मुलींना आवडते. अशा परिस्थितीत, MANKLES त्यांना खूप आकर्षक वाटेल.

क्लासी ऍक्सेसरीज

तुम्ही चांगल्या कपड्यांसोबत अॅक्सेसरीज मॅच केल्या पाहीजेत. यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडतो. अॅक्सेसरीजची परफेक्ट निवडणे तूमचा लुक आणखी स्टायलिश बनवते. तुम्ही अॅक्सेसरीज निवडताना चांगले क्लासी घड्याळ निवडा. अॅक्सेसरीज निवडणे ही एक कला असून मुलींना ही कला आवडते.

व्ही नेक स्वेटर

वातावरणाचा काही अंदाज सांगता येत नसल्याने कोणत्याही ऋतुत तूम्ही स्वेटरचा विचार करू शकता. स्वेटरमध्ये स्टायलिश लुक मिळवण्यासाठी व्ही नेक स्वेटर उत्कृष्ट आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com