

Father's Day 2026: How a Single Father's Sacrifice Inspired a Global Celebration
sakal
Who Started Father's Day: वडील हे अनेकदा आपल्या भावना शब्दांत व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून त्यांचे प्रेम आणि काळजी सतत जाणवत असते. मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या स्वप्नांपर्यंत, वडील कायम त्यांच्या पाठीशी उभे असतात. म्हणूनच त्यांनी दिलेले मार्गदर्शन, घेतलेले कष्ट आणि निःस्वार्थ प्रेम याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस आज २१ जून रोजी साजरा केला जात आहे. मात्र हा दिवस साजरा करण्याची सुरूवात कशी झाली? हा दिवस कोणी सुरू केला हे जाणून घेणही तितकेच महत्त्वाचे आहे.