Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Iran Israel War Impact On Public Mental Health: सध्या चालू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाच्या सतत बातम्या पाहिल्याने तणाव आणि भीती वाढू शकते. असा परिस्थितीत मानसिक संतुलन राखण्यासाठी तज्ज्ञांचे प्रभावी उपाय जाणून घ्या.
how to stay calm during international crisis

how to stay calm during international crisis

Sakal

Updated on

How to deal with anxiety about war news: इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे संपूर्ण जगात चिंता वाढली आहे. मिसाइल हल्ले आणि लष्करी कारवाईंबाबत बातम्या ऐकून लोक भविष्यात सुरक्षित राहतील का, याची चिंता करतात. आपण जरी युद्धाजवळ नसलो तरी सतत बातम्या आणि सोशल मीडियावर अपडेट्स पाहिल्याने मनावर ताण येऊ शकतो. अशा वेळेस आपले मानसिक आरोग्य जपणे आणि शांत राहणे खूप गरजेचे आहे. तणावाची लक्षणे ओळखणे आणि काही सोपे उपाय वापरणे आपल्याला शांत आणि संतुलित ठेवू शकते.

लक्षात ठेवा की युद्ध आणि जागतिक संघर्षाबद्दल ऐकताना अनेकांना ताण येऊ शकतो. लोक सतत भविष्यासंबंधी विचार करतात आणि दिवसभर अस्वस्थ किंवा बेचैन राहतात. काहींना झोप येत नाही कारण मन सतत त्या परिस्थितीकडे जात राहते. वारंवार बातम्या पाहिल्याने अभ्यास किंवा कामावर लक्ष ठेवणेही कठीण होते. युद्धाशी संबंधित माहिती सतत पाहिल्यामुळे लोकांचा ताण वाढतो आणि मूड खराब होणे किंवा चिडचिड होणे देखील होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या घटना लोकांमध्ये भीती आणि अनिश्चितता निर्माण करतात. काय होणार हे कळत नाही, सतत काहीतरी वाईट होईल अशी भावना मनात राहते. त्यामुळे चिंता वाढते, झोप नीट लागत नाही आणि मन उदास राहतं. विशेषतः ज्यांना आधीपासून मानसिक आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्यांच्यावर याचा अधिक परिणाम होतो.

संभाव्य समस्या

चिंता

युद्ध होणार की नाही हे मनात भीती निर्माण करते. हल्ला होईल का, आपले लोक सुरक्षित असतील का, अशा विचारांनी मन बेचैन होते. वारंवार या विषयावर विचार करणे, बातम्या पाहत राहणे यामुळे मानसिक थकवा आणि येऊ शकतो.

अनिश्चिततेचा परिणाम

भविष्यात काय होईल हे समजत नाही, हीच अनिश्चितता अनेक मानसिक त्रासांना कारणीभूत ठरते. जे लोक आधीपासून ताणतणाव अनुभवत असतात, त्यांच्यात या काळात ही लक्षणे अधिक वाढण्याची शक्यता असते.

मानसिक ताण अन् चिंता दूर करून मन शांत ठेवण्यासाठी काय करावे?

बातम्यांपासून काही काळ दूर राहा

सतत सोशल मीडियावर अस्वस्थ करणाऱ्या बातम्या पाहिल्याने मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे जाणीवपूर्वक ब्रेक घेणे गरजेचे आहे.

ध्यान, प्राणायाम करा

रोज काही वेळ स्वतःसाठी काढा. श्वसनाचे व्यायाम, योग, किंवा ध्यान यामुळे तणाव कमी होतो.

प्रियजनांशी संवाद साधा

आपल्या भावना कुटुंबीयांशी, मित्रमैत्रिणींशी शेअर करा. बोलून व्यक्त होणे खूप महत्त्वाचे असते.

तज्ज्ञांची मदत घ्या

जर स्वतःहून ही स्थिती हाताळणे शक्य नसेल, तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्या.

स्वतःच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा

भविष्यात काय होईल हे आपल्या हातात नसले तरी, आपण काय करू शकतो यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com