Fitness Tips : 'या' कारणांमुळे मेहनत घेऊनही कमी होत नाही पोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fitness Tips

Fitness Tips : 'या' कारणांमुळे मेहनत घेऊनही कमी होत नाही पोट

Fitness Tips : काही लोक पोट कमी करण्यासाठी खूप परिश्रम घेतात. वेगवेगळे डाएट, खाण्या-पिण्याची बंधने पाळतात. तासन् तास व्यायाम करतात. पण एवढे सगळे करूनही म्हणावा तसा परिणाम दिसत नाही. शरीराचा बाकी भाग बारीक होऊ लागला तरी काही केल्या पोट कमी होत नाही. तुमचंही बेली फॅट काही केल्या कमी होत नाहीये तर यामागे काही संभाव्य कारणं असू शकतात. व्यायाम केल्यानंतरही पोटाची चरबी का कमी होत नाहीये, जाणून घ्या

हेही वाचा: Rashmika Fitness : तुम्हालाही व्हायचयं रश्मिका मंदानासारखं फिट? जाणून घ्या रहस्य

ताणतणाव

जर तुम्ही ताण घेतला तर पोटाची चरबी कमी होण्यामध्ये अडचण होऊ शकते. कारण तणावामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन्सचा फ्लो होतो. हार्मोन्स तुमची चयापचय क्रिया मंद करू शकतात. अशा प्रकारे कमी कॅलरीज बर्न होतात आणि लठ्ठपणा वाढतो.

हेही वाचा: Fitness : बेडवरच करा ही ३ योगासने आणि घटवा वजन

मद्यपान

प्रत्येकाला पार्टी करायला आवडते. कारण पार्टीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता आणि अनेक गोष्टी करता. पण जर तुम्ही पार्टीदरम्यान जास्त मद्यपान केलं तर वजन वाढू शकतं. परिणामी यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.

हेही वाचा: Ranveer Singh Fitness Secret: तंदुरुस्तीचं 'राज' केलं शेयर

चुकीचा व्यायाम

फक्त कार्डिओ व्यायामाने पोटाची चरबी कमी करणं अवघड आहे. हे कमी करण्यासाठी, आपण योग्य व्यायाम करावा. अहवालानुसार, आठवड्यातून २५० मिनिटे मोडरेट एक्सरसाइज आणि १२५ मिनिटे हाई इन्टेंसिटीचा व्यायाम केल्यास त्वरित परिणाम दिसून येतो.

Web Title: Fitness Tips Weight Loss Tips Bely Fats These Reasons Are Obstacles

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyle