Ranveer Singh Fitness Secret: तंदुरुस्तीचं 'राज' केलं शेयर| Bollywood Actor Ranveer Singh Share fitness Secret | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actor Ranveer Singh
Ranveer Singh Fitness Secret: तंदुरुस्तीचं 'राज' केलं शेयर

Ranveer Singh Fitness Secret: तंदुरुस्तीचं 'राज' केलं शेयर

Bollywood News: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा त्याच्या हटके स्टाईल आणि अंदाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका (Actress Deepika Padukone) हे दोघेजण समुद्रकिनाऱ्यावरील किसिंग फोटोमुळे (Social Media Viral News) चर्चेत आले होते. तो फोटो सोशल मीडीयावर चर्चेत आला होता. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते. आताही रणवीर त्याच्या बॉडी बिल्डिंगवरुन (Entertainment News) चर्चेत आला आहे. तो त्यामुळे वादात सापडण्याची शक्यता आहे. त्याचे कारण त्यानं आपल्या बॉडीमागील सिक्रेट ओपन केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी लागलीच त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक एनर्जीटीक अभिनेता म्हणून रणवीरचं नावं घेतलं जातं.

सध्या रणवीरच्या (Ranveer singh) आगामी काही प्रोजेक्टची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये रणवीरचा हटके लूक आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्याचे कारण त्यानं हेल्थ सिक्रेट ओपन केलं आहे. त्याच्या फिटनेस आणि उत्साहाचं कारण काय हे त्यानचं सांगितलं आहे. आस्क मी एनीथिंगच्या सेशनच्या निमित्तानं त्याला त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले होते. यावर त्यानं चाहत्यांसोबत आपल्या फिटनेसचे सिक्रेट शेयर केले आहे. तो म्हणाला मी माझ्या दिवसांचे पूर्ण नियोजन केले आहे. त्यामध्ये 130 ग्रॅम ओट्स, 15 ग्रॅम नट्स आणि 5 ग्रॅम चॉकलेट आणि चीप्स यांचा समावेश आहे. माझ्या दिवसाची सुरुवात हे खाण्यानं होते. त्यानंतर मी वर्कआऊटला सुरुवात करतो.

हेही वाचा: Pushpaच्या 'उ अंतवा' गाण्यावर नवरा-नवरीचा जबरदस्त डान्स Viral!

यानंतर मी सकाळी सकाळी मी डिटॉक्स ड्रींकही घेतो. त्याच्यासह काही इम्युनिटी बूस्टिंग शॉट्सचा आनंदही मी घेत असतो. याच्याशिवाय प्रोबायोटिक ड्रिंक आणि शिलाजीत, अश्वगंधा आणि खजुराचे लाडूही मी खातो. यासगळ्याचा मला खूप फायदा होतो. असेही रणवीरनं यावेळी सांगितले. वास्तविक शिलाजीत हे टेस्टेरॉन वाढविण्याचे काम करते. आयुर्वेदामध्ये शिलाजीतला खूप महत्व आहे. रणवीरच्या चाहत्यांना जेव्हा तो शिलाजीत खातो असे कळले तेव्हा त्यांना धक्का बसला. शिलाजीत आणि अश्वगंधा हे ताण तणाव दूर करण्याचे काम करतात. त्याचा मला मोठा सकारात्मक फायदा झाल्याचे रणवीरनं सांगितलं आहे.