Gym Workout की होम वर्कआउट? तुमच्यासाठी कोणता Exercise आहे जास्त योग्य

gym workout vs home workout: फिट राहण्यासाठी केवळ जीममध्ये जाऊन घाम गाळणं जास्त योग्य, असा काहींचा समज असतो. तर काहींच्या मते घरच्या घरी केलेला साधा व्यायामही फिट राहण्यासाठी पुरेसा आहे असा समज असतो. जाणून घेऊयात कुठं व्यायाम करणं आहे योग्य
gym workout vs home workout
gym workout vs home workoutEsakal

Gym workout vs Home workout: निरोगी राहण्यासाठी Healthy Life योग्य आहारासोबतच नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. नियमितपणे व्यायाम Exercise केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. खास करून सध्याच्या काळात कामाच्या स्वरूपामुळे शरीराच्या अनेक व्याधी उत्पन्न होऊ लागल्या आहेत. Fitness which exercises helpful home or gym workout

शरीर सक्रिय राहत नसल्याने वजन वाढण्यासोबतच Weight Gain नवनव्या आजारांना निमंत्रण मिळू लागलं आहे. अशात नियमितपणे व्यायाम किंवा वर्कआउट करणं गरजेचं ठरतंय. अनेकजण फिटनेससाठी व्यायामाकडे लक्ष देऊ लागले आहेत. फिट Fitness राहण्यासाठी व्यायामाचे अनेक पर्याय आहेत.

कुणी जिममध्ये Gym जाऊन वर्कआउट करणं पसंत करतं तर कुणी झुंबा, पिलेट्स, योगा अशा अॅक्टिव्हिटीमधून फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण घरीच योगा किंवा काही व्यायाम करून शरीर तंदूरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.

फिट राहण्यासाठी केवळ जीममध्ये जाऊन घाम गाळणं जास्त योग्य, असा काहींचा समज असतो. तर काहींच्या मते घरच्या घरी केलेला साधा व्यायामही फिट राहण्यासाठी पुरेसा आहे असा समज असतो.

खरं तर दोन्ही ठिकाणी केलेल्या वर्कआउटचा शरीराला केवळ फायदाचं होतो. हे फायदे केवळ वेगवेगळे आहेत. तेव्हा आज आपण जिम किंवा होम वर्क आउटचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊ यात जेणेकरून तुम्हाला योग्य पर्याय निवडणं सोप होईल....

हे देखिल वाचा-

gym workout vs home workout
Fitness साठी जीममध्ये पैसे भरण्याएवजी ‘या’ Activityने रहा फिट ते ही फुकटात!

उपकरणं- जिममध्ये जाण्याचा फायदा म्हणजे जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी वेगवेगळी उपकरणं उपलब्ध असतात. जिममध्ये कार्डियो मशीन, ट्रेडमिल, स्टेयर क्लायंबर, रोइंग मशिन, तसचं सर्व प्रकारची वेट्स अशी अनेक उपकरणं असल्याने एक्सरसाइज करणं सोप होतं. अर्थात जिममध्ये जाण्यासाठी तुम्हाला वर्षाला किंवा महिन्याला भरपूर पैसे भरावे लागतात.

दुसरीकडे घरीच एक्सरसाइज करायचे म्हटल्यास तुम्हाला उपकरणं उपलब्ध होत नाहीत. काहीजण ट्रेडमिल किंवा सायकल असं एखादं उपकरणं विकत घेतात. मात्र उपकरणं महाग असण्यासोबतच त्याला भरपूर जागा लागत असल्याने ती घरी घेणं शक्य नसतं.

काय अधिक सोयीस्कर- घरी वर्कआउट करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा वेळेनुसार वर्कआउट करू शकता. खास करून ज्यांच वेळापत्रक अत्यंत व्यस्त असतं किंवा घराजवळ जीम नसल्यास घरीच व्यायाम करणं सोयीचं ठरतं.

जिममध्ये जाण्यासाठी तुम्हाला काही वेळ खर्च करावा लागू शकतो. तसचं काही वेळेस जीममध्ये मशीन इतर कुणी वापरत असल्यास तुम्हाला थांबावं लागू शकतं.

वातावरण- वर्कआउट करण्यासाठी जिममधील वातावरण हे अत्यंत प्रेरणादायी असतं. इतर वर्कआउट करणाऱ्यांकडे पाहून एक्सरसाइज करण्याचा उत्साह वाढतो. तसचं जिममध्ये तुमचं लक्ष केवळ वर्कआउटवर केंद्रीत असतं.

तर घरामध्ये व्यायाम करण्यासाठी तुम्हाला खास जागा हवी. शिवाय इतर गोष्टींचा सारखा अडथळा येऊ नये, ज्यामुळे तुम्हाला वर्कआउट करताना सारखा ब्रेक घ्यावा लागेल किंवा लक्ष विचलीत होईल. घरी वर्कआउट करण्याचा हा एक तोटा असू शकतो.

gym workout vs home workout
Fitness Tips : सौंदर्य वाढवणारा कपालभाती प्राणायाम करताना या चुका टाळा; नाहीतर...

एक्सरसाइजची विविधता आणि सोशल लाइफ- जिममध्ये अलिकडे वेगवेगळ्या वर्कआउटसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. जसं की अलिकडे जिममध्येही योगा किंवा किकबॉक्सिंग, पिलेट्स अशा वर्कआउटच्या विविध व्हरायटी उपलब्ध आहेत. यामुळे एकच व्यायाम करून बोअर होत नाही आणि वर्कआउटसाठी उत्साह कायम राहतो.

शिवाय अनेकदा जिम किंवा ग्रुप फिटनेस क्लासमध्ये एकत्रित रित्या वर्कआउट केल्याने प्रेरणा मिळते. इतर लोकांच्या भेटीगाठीसाठी किंवा इतर फिटनेस प्रेमींशी संवाद साधण्यासाठी जिम एक चांगली जागा आहे. जिथे साधारण एकाच उद्देशाने प्रेरित अनेकजण एकत्रित येत असतात.

हे देखिल वाचा-

gym workout vs home workout
Physical Fitness : स्वत:साठी फक्त एक तास...सुदृढ आरोग्यासाठी अनेक ‘पॅटर्न’!

कोणता वर्कआउट योग्य

शरीरासाठी तुम्ही कुठे आणि कोणता वर्कआउट करताय यापेक्षा तुम्ही नियमित वर्कआउट करणं जास्त गरजेचं आहे. मग ते जिम असो वा घर. तुम्ही तुमच्या सोयीनुसार याची निवड करू शकता. जिथे जिमध्ये तुम्हाला उपकरणं आणि वातावरण निर्मिती पाहायाला मिळते. तर घरी तुम्ही तुमच्या सोयीनुसार एकांतातही वर्कआउट करू शकता.

अलिकडे घरच्या घरी योगा किंवा इतर काही उपकरणांशिवाय केल्या जाणाऱ्या एक्सरसाइजसाठी ऑनलाइन क्लास किंवा ट्रेनरची सोय असल्याने तुम्हाला घरी देखील चांगला वर्कआउट करणं शक्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com