
कोल्हापूर : अंगावर कोणत्याही ठिकाणी रैशेज येणे ही एक सर्वसाधारण समस्या आहे या समस्येचे नेमके कारण काय आणि त्यावर उपाय काय याबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.जेव्हा त्वचेवर रैशेजना सुरुवात होतात तेव्हा त्याचे स्वरूप बदलते. त्याचबरोबर त्याचा रंगही बदलू लागतो. त्वचा कोरडी होणे वारंवार खाज सुटणे या समस्येमुळे आपण ग्रस्त होतो या रैशेज शरीराच्या कोणत्याही अंगावर उठतात आणि आपण त्याला एक आजारच आहे असे समजून जातो.
प्रत्येक वेळी आजारपणामुळे अशा रैशेज उठतात असे नाही. अनेक वेळा या समस्येचे वेगळेही कारण असु शकते. जसे जास्त वेळ उन्हामध्ये फिरणे, अंगावर फिट कपडे घालने. अशी वारंवार समस्या जाणवू लागली तर त्याबाबत त्यातून सुटका करून घेण्याची इच्छा होते. परंतु यापासून सुटका करून घेताना याची कारणे काय आहेत हे पण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्वचेवर रैशेज येणे त्याची कारणे आणि उपाय याबाबत माहिती देणार आहेत.
कोरडी आणि संवेदनशील त्वचा
जर तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर अशा त्वचेवर रैशेज वाढण्याची जास्त शक्यता असते जर तापमान कमी झाले तर या कोरड्या त्वचेवर रैशेजउठण्याचे प्रकार सुरू होतात त्यामुळे यापासून वाचण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइस्चरायझर चा वापर करा त्याचबरोबर त्वचा ओलसर राहण्यासाठी आहारामध्ये ही विशिष्ट पदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे. त्वचेसाठी उत्पादनांमध्ये हानिकारक रसायने असणार नाहीत
या गोष्टीची काळजी घ्या
उष्णता
उन्हाळा आणि दमट हवामानामध्ये उष्णतेने रैशेज येणे सर्वसाधारण गोष्ट आहे.
उष्णतेने जर रैशेज उठले तर त्याठिकाणी अधिक खाज सुटणे ,तसेच लालसर चट्टे उठतात. जर तुम्ही अशा समस्येवर एक विशिष्ट फॉर्म्युला वापरला तर ही समस्या दूर होईल. यावर उपाय म्हणून तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. हे जेल त्वचेला सर्वसाधारणपणे ओलसर करून शांत करते.बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे ही त्याच्यावर रैशेज येतात या स्थितीत त्वचा अधिक कोरडी तसेच त्या ठिकाणी चट्टे उठतात. जर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन रैशेज उठले असतील तर अँटी बॅक्टरियल आईनामेंट या पावडरचा आपण वापर करू शकतो.
औषधाचा परिणाम
काही आपल्या त्वचेला खाज सुटण्यासाठी कारण ठरू शकतात. यामुळे आपल्या त्वचेवर रैशेज निर्माण होतात. खासकरून रक्तदाब, एस्ट्रोजन, पेन किलर अथवा उच्च कोलेस्ट्रॉल औषधामुळे खाज सुटणे आणि स्क्रॅच पडणे ही समस्या उद्भवते. औषधाच्या विपरीत परिणामांमुळे ही समस्या उद्भवते. परंतु ही समस्या स्वतःहूनच दूर होते. जर तुम्हाला ते असह्य होत असेल तर अशावेळी तुम्ही त्वचा रोग तज्ञचा सल्ला घेऊ शकता.
कपड्यामुळे समस्या
तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही घालणाऱ्या कपड्यामुळे त्वचेवर रैशेज उठतात.तुम्ही अधिक फिट कपडे घालत असाल तर हे कपडे त्वचेवर घर्षण करतात आणि रैशेज उठण्याची समस्या निर्माण होते. याच बरोबर फॅशनच्या सवयीत असलेले रसायन अथवा रंग याचाही त्वचेवर परिणाम होतो आणि त्वचेवर रैशेज उठतात. यासाठी तुम्ही लूज कपडे घालावेत जेणेकरून त्वचेला खुली हवा मिळेल. त्याच बरोबर जर तुम्हाला विशिष्ट कपड्याचे रिॲक्शन येत असेल तर अशी कपडे घालणे टाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.