उन्हाळ्यात स्किनला  ब्रेकआउट फ्री ठेवण्यालाठी या पाच टिप्सचा घ्या आधार

five tips to keep your skin breakout free in the summer lifestyle marathi news
five tips to keep your skin breakout free in the summer lifestyle marathi news
Updated on

कोल्हापूर : उन्हाळा ऋतु हा मुलींच्यासाठी अत्यंत आवडता ऋतू असतो कारण या ऋतूमध्ये आपल्याला आवडत्या स्टाईलचे कपडे घालण्याची मुभा मिळते या ऋतूत अनेक औटफिट्स कपडे सहजपणे परिधान करू शकतात या ऋतूमध्ये शॉर्ट आणि स्कर्ट वापरून आनंद घेऊ शकतात परंतु दुसऱ्या बाजूला येणारा घाम आणि त्वचे ला सुटणारी खाज यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.


 त्वचेच्या अनेक समस्यांपैकी ब्रेक आऊट ही एक मोठी समस्या आहे. उन्हाळा सुरु होताच शरीराच्या वेगवेगळ्या भागावर  चट्टे दिसू लागतात. तेव्हा महिला यापासून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना करतात. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये असेच उपचार सुरू असतात. आज आपण या ठिकाणी पाच पद्धती सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुमचे शरीर उन्हाळ्यामध्ये ब्रेक आउट फ्री राखू शकता.


1) एक्ने फाइटिंग उत्पादनांना बनवा क्लींजिंग रुटीन चा हिस्सा

उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला घाम येतो .त्यामुळे त्याची दुर्गंधी निर्माण होते. अशावेळी आपल्या त्वचेला ब्रेक आउट फ्री ठेवण्यासाठी आपले घाम आणि त्यावर साचलेले मळ काढून स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. अशा वेळी आपण क्लींजिंग रुटीन चा वापर करू शकतो ज्या मध्ये एक्ने फाइटिंग प्रॉडक्ट सुद्धा त्यातच असते हे केवळ चर्चेला खोलवर जाऊन स्वच्छ करते असे नाही परंतु आपल्या त्वचेवर येणाऱ्या पुरळ निर्माण करणे व करणाऱ्या बॅक्टरिया आला सुद्धा नष्ट करतात. आपण नेहमी बॉडी वॉश निवड करताना त्यामध्ये सलीशालिक ॲसिड आहे की नाही हे पाहावे. याचबरोबर एंटी-बैक्टीरियल साबण आणि क्लेरिफाइंग बॉडी वॉश आपल्या त्वचेला एक्ने फ्री ठेवण्यासाठी मदत करते.

2) सावधानपूर्वक करा एक्सफोलिएट 

त्वचेवरील लाल चट्टे हटवण्यासाठी आणि ते डीप लिंच करण्यासाठी एक्सफोलिएट करणे अत्यंत आवश्यक असते. उन्हाळ्यामध्ये अधिकच संवेदनशील असते अशावेळी पुन्हा एक्सफोलिएट केल्यास त्वचेला सूज आणि ब्रेकची समस्या निर्माण होते यासाठी त्याच्या एक्सफोलिएट करण्यापूर्वी जेंडर आणि क्रीमी बॉडी पाॅलिष किंवा शॉवर पंप चा वापर करावा. त्याचबरोबर आठवड्यातून एक वेळा त्वचेला एक्सफोलिएट करा त्यामुळे मृत त्वचा त्वरित निघून जातात


3) सुदिनं लोशनचा वापर करा
 
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेला थंडावा देण्यासाठी आपण सुदिनं लोशन वापरू शकतो. हे  पुरळ नाहीसे करतात त्याच बरोबर सुदिन लोशन मध्ये लव्हेंडर, लिंब असे घटक असतात जे आपल्या त्वचेला एंटी- इन्फ्लैमटरीएंटी प्रदान करतात. त्याचबरोबर यामुळे त्वचा दिवसभर थंड राहते.


4) घामावर  लक्ष ठेवा
 
उन्हाळ्यामध्ये ब्रेक आऊट मुख्य समस्येला  घाम कारणीभूत ठरतो. जर तुम्हाला घामाच्या मुळे समस्या जाणवत असेल तर तुम्हाला त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पावडर रोल आणि एरोसिल स्प्रे आपल्या त्वचे मधून घाम अधिक येण्यापासून रोखता. एंटीपर्सपिरेंट्स सकाळी अंघोळी नंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण त्वचेवर लावू शकतो.

5)त्वचेच्या समस्येच्या  ठिकाणी अधिक लक्ष द्या

उन्हाळ्यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागावर ब्रेक आउट आणि एक्ने ही समस्या उद्भवते. परंतु आपल्या शरीरातील असे काही भाग असतात की त्या ठिकाणी ब्रेक आऊट  धोका अधिक असतो. शरीरातील पोषक तत्वे कमी असल्यामुळे असे घडते. यामुळे मोठ्या प्रमाणात खाज सुटण्याची प्रकार होतात. त्यामुळे कपड्याच्या आत मध्ये मोठी समस्या निर्माण होते. हे रोखण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपली त्वचा हायरेटेड ठेवणे तसेच ब्रेक आउट फ्री ठेवण्यासाठी कूलिंग बॉडी जेल चा वापर करावा

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com