

Pressure Cooker Cooking Tips : प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत. इंधनाचा वापर कमी होतो, वेळेची बचत होते. पण काही पदार्थ प्रेशर कुकरमध्ये अजिबात शिजत नाहीत. पूर्वीच्या काळात पारंपरिक पद्धतीने अन्न शिजवणे म्हणजे कठीणच आणि वेळखाऊ काम असायचे. पण आधुनिक युगात प्रेशर कुकरचा शोध लागला आणि हे काम सोप्पे झाले. आणि पुढे कुकरने प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आपले खास स्थान निर्माण केले.
कारण प्रेशर कुकरमुळे स्वयंपाक करणे खूप सोपे झाले म्हणून प्रत्येक गृहिणी त्याचा जास्तीत जास्त वापर करू लागली. पण प्रेशर कुकर मध्ये ठराविक गोष्टीच शिजवाव्या लागतात ही गोष्ट लोक विसरून गेले. आजच्या लेखात आपण प्रेशर कुकर मध्ये काय शिजवावे आणि काय शिजवू नये याविषयी माहिती पाहणार आहोत.
आपण बटाटे बहुतेकदा प्रेशर कुकरमध्ये शिजवतो, पण प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. पण तरीही तुमच्याकडे बटाटे शिजवण्यासाठी केवळ कुकरच असेल तर भरपूर पाणी घालून ते उकळल्यानंतर ते बटाटे चांगले धुवून घ्यावे.
अनेकजण मासेही शिजवण्यासाठी कुकरच वापरतात पण प्रत्यक्षात हा अत्यंत चुकीचा मार्ग आहे. मासे खूप लवकर शिजत असल्याने, प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यांची चव खराब होऊ शकते. अशावेळी मासे ओपन पॅनमध्ये शिजवणे नेहमीच चांगले असते.
अनेकदा लोक वेळेच्या कमतरतेमुळे प्रेशर कुकरमध्ये भात शिजवतात. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे भात शिजवण्यासाठी कुकरचा वापर करतात, तर अशी चूक पुन्हा करू नका. वास्तविक, कुकरमध्ये तांदूळ शिजवल्याने त्यातील स्टार्च हे ऍक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर टाकते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे पातील्यात किंवा भांड्यात झाकून भात बनवणे हा उत्तम पर्याय मानला जातो.
प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यावर पास्तामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त वाढते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत, कढईत पास्ता शिजवणे किंवा तळणे हा पास्ता बनवण्याचा उत्तम मार्ग मानला जातो.
भाज्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे यांचा समावेश असतो, जे प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यावर पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. बहुतेक भाज्या, विशेषत: हिरव्या पालेभाज्या, कढईत शिजवल्या पाहिजेत जेणेकरून त्यांची पोषकता कमी होणार नाही.
बरेच लोक प्रेशर कुकरमध्ये अंडी उकळतात. हे देखील चुकीचे आहे. अंडी आत फुटू शकतात. प्रेशर कुकरमध्ये स्फोटही होऊ शकतो. दूध थोडे उकळते आणि उतू जाते. त्यामुळे दुधाने बनवलेला कोणताही पदार्थ कोणत्याही प्रेशर कुकरमध्ये शिजवू नका. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.