esakal | सावधान! चीज खाल्ल्यामुळे होतो सेक्स लाइफवर परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! चीज खाल्ल्यामुळे होतो सेक्स लाइफवर परिणाम

सावधान! चीज खाल्ल्यामुळे होतो सेक्स लाइफवर परिणाम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तुम्हाला फास्ट फूड आवडतं? सहाजिकच याचं उत्तर अनेक जण होकारार्थीचं देतील. आजच्या बदलत्या काळानुसार, अनेक जण सकस व पौष्टिक पदार्थांकडे कानाडोळा करुन पिझ्झा, बर्गर, चिप्स अशा फास्टफूडच्या आहारी जातांना दिसत आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जणांना बाहेर मिळणारे चमचमीत आणि चटपटीत पदार्थ आवडतात. यात बटर, चीज वैगरे असे पदार्थ म्हटलं तर मग काही विचारायचीच सोय नाही. अनेक जणांचा बटर व चीज हा वीक पॉइंट असतो. म्हणजे साधं सॅण्डविच जरी घेतलं तरी त्यावर एक्स्ट्रा चीज किंवा बटर घातलं जातं. मात्र, हे पदार्थ चवीने कितीही रुचकर लागत असले तरीदेखील ते शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. यामध्येच चीज अतिरिक्त प्रमाणात खाल्लं तर त्याचा परिणाम हा थेट सेक्स पॉवरवर होऊ शकतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

एका ब्रिटीश वृत्तपत्रानुसार, आजकाल चीजचा वापर करुन अनेक पदार्थ तयार केले जातात.पदार्थाची चव वाढवणारं चीज व्यक्तीच्या शरीरवृद्धीसाठी आवश्यक असलं तरीदेखील त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या सेक्स पॉवरवर होत असतो. यात सर्वाधिक धोका हा तरुण युवकांना असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे तीनपेक्षा अधिक चीज स्लाइस खाल्ल्यास त्याचा परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होत असतो.

दरम्यान, जीच खाल्ल्यामुळे त्याच्या प्रभावामुळे शुक्राणूंची क्षमता २० ते २५ टक्क्यांनी कमी होत असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर चीजसारख्या अन्य काही मेदयुक्त घटकांचा आहारात समावेश केल्यास अन्य काही शारीरिक समस्याही निर्माण होऊ शकतात.

loading image