esakal | लोखंडाच्या भांड्यात चुकूनही करु नका 'हे' पदार्थ
sakal

बोलून बातमी शोधा

लोखंडाच्या भांड्यात चुकूनही करु नका 'हे' पदार्थ

लोखंडाच्या भांड्यात चुकूनही करु नका 'हे' पदार्थ

sakal_logo
By
शर्वरी जोशी

महिलांची हक्काची जागा म्हणजे त्यांचं स्वयंपाक घर. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचं तिच्या स्वयंपाक घरावर आणि येथील प्रत्येक वस्तूवर जीवापाड प्रेम असतं. विशेष म्हणजे काही खास पदार्थ तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारची वेगळी भांडीही वापरली जातात. उदा. पोळी, फिशफ्राय यांसाठी वेगवेगळा तवा वापरला जातो. बिर्याणीसाठी वेगळं पातेलं, रोजच्या भातासाठी वेगळा कुकर असे अनेक भांड्यांचे प्रकार स्वयंपाक घरात पाहिले जातात. इतकंच नाही तर महिलांची ही वाढती मागणी पाहता बाजारातही वेगवेगळ्या आकाराची व प्रकाराची भांडी सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. यामध्ये स्टील, लोखंड, पितळं यांची भांडी सर्रास वापरली जातात. परंतु, या प्रत्येक भांड्यांमध्ये कोणते पदार्थ करावेत हे ठरलेलं असतं. मात्र, आज आम्ही लोखंडी भांड्यात कोणते पदार्थ करु नयेत हे सांगणार आहोत. (foods-to-never-cook-in-iron-kadhai)

१. मासे -

लोखंड कढई किंवा पातेल्यात कधीही फिश फ्राय किंवा फिश करी असे पदार्थ करु नयेत. असे अनेक मासे आहेत जे लोखंडी कढईच्या तळाला चिकटून बसतात. त्यामुळे हे मासे कढईतून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तेलाचा वापर करावा लागतो. तसंच अनेकदा कढई खराबही होते.

२. अंड्याचे पदार्थ नकोच -

लोखंडी कढई, पॅन किंवा तवा यांच्यामध्ये अंड्याचे पदार्थ करु नयेत. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकदा लोखंडी भांड्यात ऑम्लेट किंवा तत्सम पदार्थ केले तर ते भांड्याला चिकटून बसतात. परिणामी, बऱ्याचवेळी लोखंडाचा गंज पदार्थामध्ये मिक्स होऊ शकतो.

हेही वाचा: नवीन ऑफिस जॉइन करताय? कामाच्या ठिकाणी वावरताना लक्षात ठेवा या 4 गोष्टी

३. आंबट पदार्थ करु नका -

लोखंडी भांड्यात कधीही आंबट पदार्थ करु नका. उदा. टोमॅटोची भाजी, आवळ्याचे पदार्थ, लिंबू घातलेले पदार्थ कधीही करु नका. लोखंडी भांड्यात आम्लयुक्त पदार्थ केल्यास भांड्याचा वास त्या पदार्थामध्ये उतरतो. परिणामी, हे पदार्थ शरीरासाठी घातक ठरू शकतात.

४. गोड पदार्थ -

लोखंडी भांड्यात गोड पदार्थ केल्यास पदार्थाला लोखंडाचा विशिष्ट वास येऊ लागतो. तसंच हा पदार्थ भांड्याच्या तळाला चिकटून बसतो आणि त्याचे डाग बराच काळ तसेच राहतात.

loading image