esakal | कोरोनाच्या भीतीने वारंवार हात धुताय, मग थांबा...

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या भीतीने वारंवार हात धुताय, मग थांबा...

सॅनिटाइजरचा अतिरेक वापरही ठरु शकतो धोकादायक

कोरोनाच्या भीतीने वारंवार हात धुताय, मग थांबा...
sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यात मास्क लावणे, हात धुणे, सॅनिटाइजरचा वापर करणे याविषयी विविध स्तरांमधून जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, या नियमांचं पालन करणारे सध्या दोन गट पाहायला मिळतात. त्यातील पहिल्या गटात सॅनिटाइजरचा वापर करणारे असंख्य आहेत. परंतु, ते मास्क वापरण्यास टाळाटाळ करतात. तर दुसऱ्या गटातील लोक प्रमाणापेक्षा जास्त खबरदारी घेत आहेत. परिणामी, यातील काही जण  वारंवार हात धुवूत आहेत. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं चुकीचं आहे. वारंवार हात धुतल्यामुळे अनेक त्वचेसंबंधी समस्या उद्भवू शकतात.

सध्याच्या काळात हात धुणे व स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु, काही जण या स्वच्छतेचा अतिरेक करत आहेत.  अगदी ५-५ मिनिटांनादेखील काही जण हात धुणारे आहेत. परंतु, वारंवार हात धुतल्यामुळे किंवा हातांना साबण लावल्यामुळे त्वचेशीनिगडीत काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेशी निगडीत समस्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

१. घराबाहेर असतांना सॅनिटाइजरचा वापर करा. घरात असतांना सॅनिटाइजर वापरण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी हात धुणे, हात पुसणे हा पर्याय वापरु शकता. सॅनिटाइजरमध्ये ६० टक्के अल्कोहोल असतं त्यामुळे त्याचा जास्त वापर करु नये. निदान घरी असतांना तरी त्याचा वापर करणे टाळावं.

हेही वाचा :  उन्हामुळे बेजार झालेल्या हत्तीची धम्माल; बाथटबमध्ये करतोय अंघोळ

२. कडक गरम पाण्याने हात धुवू नका. त्याऐवजी कोमट पाण्याने हात धुवा. गरम पाण्यामुळे हाताची त्वचा भाजण्याची शक्यता असतं. तसंच त्वचा कोरडी होते.

३. हात धुतल्यावर लगेच मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे हातातील ओलावा टिकून राहिल.

४. हातांसाठी वापरत असलेल्या क्रिममध्ये फ्रिगरेन्स नसावा. त्यामुळे स्क्रीन जळते.

५. सतत हात धुतल्यामुळे हात कोरडे पडतात.

६. घराबाहेर पडतांना हातात gloves घाला.