Butter Milk Benefits: उन्हाळ्यात ताक प्यायल्याने पोटाचे विकार होतात दूर

Butter Milk: ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त असते.
Butter Mil
Butter MilSakal

- वैद्य सोहन पाठक

Butter Milk

अंगातून घामाच्या धारा निघत असताना शरीराला शीतलता देणाऱ्या पेयांवर भर दिला जातो. बाजारात अनेक पेये मिळत असली, तरी शरीराला शीतलता देणाऱ्या पेयांमध्ये सहज मिळणारे म्हणजे स्वयंपाकघरातले ताक. आयुर्वेदिकदृष्ट्या ताकाला प्राधान्य दिले जाते. आयुर्वेदात ताकाला अमृत म्हटले आहे. ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त असते. लो कॅलरी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ते फायदेशीर आहे. शक्यतो ताक ताजे हवे.

ताक हे घरोघरी सहज उपलब्ध असते. शिवाय ते तातडीने तयारही करता येते. कालवणाचा विषय येतो, तेव्हा ताक-भातही चालतो. ताक कुणाला आवडो न आवडो मात्र ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक खेळाडूंच्या डायटेशियन म्हणून काम करणाऱ्या कुंदा महाजन म्हणाल्या, की ताक हे प्रोबायोटिक आहे. ताकात बी-12 व्हिटॅमिन असते.

दह्यामुळे काहींना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मात्र, ताकाने तसे होत नाही. काही पोटाचे आजार असणाऱ्यांनी जेवणाऐवजी नुसते ताक पिले, तरी त्यांना समाधान मिळते. कारण ताकाचे जिवाणू प्रोबायोटिक असतात आणि ते आपणाला तंदुरुस्त ठेवतात.

कॅलरीबाबत जागरूक असणारे, वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांनी ताक पिणे फायदेशीर. काही जण ताकाने ॲसिडिटी होते असे म्हणतात. परंतु, असे व्हायला नको. असा त्रास होऊ नये, यासाठी शिळे म्हणजे आंबट ताक पिऊ नये. लोणी न काढलेले ताक खूप चांगले. लाकडी रवीने घुसळलेले ताक स्वादिष्ट असते.

Butter Mil
High Protein Sprouts Salad : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी स्प्राऊट्स सॅलेड, जाणून घ्या सोपी रेसिपी

वैद्य सोहन पाठक म्हणाले, की ताकात मीठ किंवा शिंदीलोण टाकून पिल्यास पोटाचे विकार दूर होतात.

  • विरजण कसे लावायचे?

तुपासाठी सायीसकट विरजण लावतात. केवळ ताकासाठी विरजण लावायचे असल्यास साय काढून कोमट दूध वापरतात. अशा विरजणासाठी ताजे, गोड दही वापरावे. विरजणासाठी मातीचे पसरट तोंडाचे पात्र सर्वोत्तम. मातीचे पात्र नसल्यास चिनी मातीचे किंवा काचेचे भांडे वापरता येते.

  • ताक वापरताना

ताक पातळच असावे. आधी दही थोडेसे घुसळून घेतल्यावर नंतर थोडे थोडे पाणी मिसळून घुसळावे.

ताक फ्रीजमध्ये ठेवल्यास सकाळचे सायंकाळी पिता येते, कोल्ड्रिंकऐवजी चांगला पर्याय.

आजारी माणसे, दूध पचत नसलेली लहान मुले अशांना पर्याय म्हणून ताकापासून पेज करून देता येते.

ताकामध्ये मीठ, साखर, जिरेपूड, पुदीना काहीही टाकले तरी ते चांगलेच लागते.

ताकाला आयुर्वेदात अमृत समजले जाते, इतके त्याचे फायदे आहेत. ताक पचायला हलके आहे. अग्निदीपन करणारे म्हणजे पचनशक्ती वाढविणारे आहे. वात, पित्त, कफ या तिन्ही विकारांवरचा ताक हा उत्कृष्ट उपाय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com