Fridge Cleaning Hacks: 'या' सोप्या टिप्स वापरून फ्रीजला आलेला पिवळेपणा दूर करा

आपल्या किचन मधील फ्रीजच्या स्वच्छतेचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी येतो.
Fridge
Fridgeesakal

आपल्या किचन मधील फ्रीजच्या स्वच्छतेचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी येतो. आपल्या फ्रिजला पडलेले पिवळे डाग हे फ्रिजमधली घाण दर्शवतात, त्यामुळे आपले फ्रिज हे वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. जर आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तीना निरोगी ठेवायचे असेल तर त्यासाठी आपण आपल्या घरातील फ्रीज नियमितपणे साफ करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सामान्यत: प्रत्येक गृहिणी ही रेफ्रिजरेटरच्या स्वच्छतेबद्दल निष्काळजी असतेच, आपण सतत फ्रिजमध्ये अनेक खाद्यपदार्थ आणि शितपेये ठेवत असतो. सोबतच भाजीपाला ठेवतो. त्यामुळे हे घरगुती उपकरण अस्वच्छ होते आणि ते जर का आपण वेळोवेळी स्वच्छ केले नाही तर त्यात जंतू निर्माण होऊ शकतात आणि मग ते जंतू फ्रीजमधील अन्नपदार्थांतुन आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. आणि हे असे जंतू जर का आपल्या पोटात गेले तर या जंतूच्या माध्यमातून आपल्याला पोटाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात.

त्यामुळे तुमचा फ्रीज विशेषत: दर आठ दिवसाला स्वच्छ करावा. आजच्या लेखात आपण फ्रीज साफ करण्याचे काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. फ्रीज हे एक असे इलेक्ट्रॉनिक गॅझेट आहे,ज्याचा त्याचा वापर हा चोवीस तास होत असतो. त्यात सतत ठेवलेल्या अन्नामुळे फ्रीजच्या कडांवर पिवळे डाग पडतात आणि त्यामुळे फ्रीजमधुन उग्र वासही येऊ लागतो. हा उग्र वास तिथे वाढणाऱ्या बॅक्टेरियामुळे येऊ लागतो.म्हणूनच फ्रीज हे वेळोवेळी स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.

1) फ्रीजमध्ये ठेवताना सर्व खाद्यपदार्थ बंद डब्यात ठेवा. साफ केल्यावर फ्रीजमधून वास येत असेल तर फ्रीज व्हिनेगरने साफ करा.

2) फ्रीजमधील सर्व ट्रे बाहेर काढा आणि चांगले धुवा. कोरडे झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.

3) लसूण कधीही फ्रिजमध्ये उघडा ठेवू नका. त्याचा वास फ्रीजमध्ये पसरतो.

4) फ्रीज साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

Fridge
वीजेविना चालवायचा असेल टीव्ही, फ्रीज, एसी तर लगेच खरेदी करा हे उपकरण

5) एका भांड्यात थोडं गरम पाणी घाला आणि त्यात मीठ घाला आणि कपड्याच्या साहाय्याने फ्रीज स्वच्छ करा.

6) फ्रीजला दुर्गंधी येत असेल तर एका भांड्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस मिसळा, त्याने फ्रीजचा आतला भाग पुसून टाका.

7) फ्रिज साफ करण्यापूर्वी पूर्णपणे रिकामा करून बटण बंद करा. सर्व भाज्या आणि फळं हवेशीर ठिकाणी ठेवा.

8) फ्रिजच्या खाली जाड कापड आणि कागद घाला. आता फ्रिज डी-फ्रॉस्ट करा. यामुळे फ्रिजमधून बाहेर पडणारं पाणी पसरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com