Friends मधल्या मोनिकाने सांगितलेले ७ प्लेजर पॉईंट्स कोणते ठावूक आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Friends

Friends मधल्या मोनिकाने सांगितलेले ७ प्लेजर पॉईंट्स कोणते ठावूक आहे?

Finding Your Own Erogenous Zones : लोकप्रिय इंग्रजी सिरीयल फ्रेंड्स तुम्ही बघितली असेल. त्यामधील एका जुन्या एपिसोडमध्ये मोनिकाने महिलांच्या ७ प्लेजर पॉईंट्स विषयी सांगितलं आहे. हा एपिसोड त्यावेळीही लोकप्रिय झाला होता. यात तिने सांगितलेल्या ७ इरोजेनस झोन (Erogenous Zones) विषयी तुम्हाला माहित आहे का?

Erogenous Zones

Erogenous Zones

इरोजेनस झोन म्हणजे काय?

इरोजेनस झोन हे आपल्या शरीरावर आणि त्वचेवरील असे भाग आहेत ज्यांनी उत्तेजना वाढवण्याची संवेदनशीलता वाढवतात. जसे तुमचे स्वतःचे इरोजेनस झोन उत्तेजित करणे आनंददायी असतं, त्याचप्रमाणे जोडीदाराच्या इरोजेनस झोनकडे पाहणे किंवा स्पर्श करणं त्यांनाही आनंद देणारं असतं.

Erogenous Zones

Erogenous Zones

कोणते आहेत इरोजेनस झोन पॉईंट्स

सामान्यतः ओठ, मान, कानाचे पाळ्या, छाती/स्तन किंवा स्तनाग्र, आतील मांड्या, नितंब आणि नंतर गुप्तांग हे सात इरोजेनस झोन पॉईंट्स म्हटले जातात. पण तज्ज्ञ म्हणतात की, थोड्याफार फरकाने व्यक्तीनुसार यात बदल होऊ शकतो. काहींचे या शिवाय शरीराचे इतर भाग हे इरोजेनस झोन पॉईंट्स असू शकतात.

Erogenous Zones

Erogenous Zones

तुमचे स्वतःचे इरोजेनस झोन पॉईंट्स कसे शोधाल?

शारीरिक संबंध ही जोडिदारांनी एकमेकांना आनंद देण्याची प्रक्रिया असल्याने कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने तुम्हाला किंवा जोडीदाराला आनंद, उत्तेजना मिळते हे शोधून काढणं गरजेचं असतं. तज्ज्ञ सांगतात की, स्पर्शातून नवीन शारीरिक आणि भावनिक प्रतिसादांसाठी स्वतःला खुले करणं गरजेचं असते.

तुम्ही इरोजेनस झोन पॉईंट्समध्ये आहात की, नाही याचा विचार न करता सर्वांगाच्या कोणत्या स्पर्शाने तुम्हाला जास्त आनंद मिळतो हे शोधणं आवश्यक असतं. हे पॉईंट्स तुम्हाला परमोच्च आनंद देत नसले तरी त्या दिशेने नेण्यास आणि सुख अनुभवण्यास मदत करतात.

तुमच्या बोटांच्या टोकापासून सुरुवात करावी आणि नंतर स्पर्शाच्या इतर प्रकारांकडे वळावे. जसं, तोंडाचा स्पर्श, पंख, एखाद्या वस्तूचा अलगद स्पर्श, थंड धातू, तुमचा गरम श्वास, गरम मेण अशा सर्व प्रकारच्या संवेदनांनी ओळखता येतं.