

Friendship Fatigue: Signs, Causes, and How to Overcome Social Burnout
esakal
Friendship Fatigue Signs and Solutions: आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात, करिअरमध्ये आणि कुटुंबात व्यस्त असते. अशातच स्वतःसाठी वेळ काढणे देखील अनेकांसाठी कठीण होऊन बसते. अशा वेळी मित्रांचे फोन कॉल्स घेणे, त्यांच्या मेसेजला रिप्लाय करणे किंवा सोशल गॅदरिंगमध्ये सहभागी होणे अनेकांना एखाद्या मोठ्या कामासारखे किंवा ओझ्यासारखे वाटू लागते. या मानसिक स्थितीलाच 'फ्रेंडशिप फटीग' (Friendship Fatigue) असे म्हटले जाते.
मित्रांवर तुमचे कितीही प्रेम असले, तरी रोजच्या धावपळीमुळे मानसिक ऊर्जा संपून जाते आणि मित्रांशी संपर्क साधणे त्रासदायक वाटू लागते. या समस्येची लक्षणे कोणती आणि या मानसिक थकव्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया-