मैत्री म्हणजे नवं कुटुंबच

आपल्या जीवन प्रवासात आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात; पण त्यामध्ये काही व्यक्ती अशा असतात ज्या पहिल्या भेटीतच आपल्याला आवडतात आणि कधी त्यांच्याशी आपले ऋणानुबंध जुळून येतात.
urmila jagtap and namrata otwani
urmila jagtap and namrata otwanisakal

- ऊर्मिला जगताप, नम्रता ओटवानी

आपल्या जीवन प्रवासात आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात; पण त्यामध्ये काही व्यक्ती अशा असतात ज्या पहिल्या भेटीतच आपल्याला आवडतात आणि कधी त्यांच्याशी आपले ऋणानुबंध जुळून येतात हे आपल्यालाही कळत नाही. असं नकळत मैत्रीचं नातं तयार झालंय अभिनेत्री ऊर्मिला जगताप आणि नम्रता ओटवानी यांच्यात.

याविषयी बोलताना ऊर्मिला म्हणाली, ‘मी आणि नम्रता फ्लॅटमेट्स आहोत. आम्ही मुंबईत एकाच घरात राहतो. मी पहिल्यांदा तिला भेटले, तेव्हा मला समजत नव्हतं, की तिच्याशी कसं बोलू? पण तिनंच सुरुवात केली. स्वतःहून पुढाकार घेतला, मला तिच्याबद्दल सगळं काही सांगितलं.

तेव्हा मला तिचं खूप कौतुक वाटलं. कारण मी खूप जास्त इंट्रोवर्ट आहे; पण त्यानंतर तिच्याशी बोलताना एक कम्फर्ट झोन तयार झाला. कालांतरानं मला ती एक व्यक्ती म्हणून समजायला लागली आणि तिला मी समजायला लागले. मग नकळतच आम्ही एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स झालो.’

नम्रता म्हणाली, ‘ऊर्मिला मला एक व्यक्ती म्हणून खूप जास्त आवडते. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एवढं असूनही ती खूप ‘डाऊन टू अर्थ’ असते. तिला कसलाच गर्व नाहीये. तिचा हा साधेपणाच तिला इतरांपेक्षा वेगळं बनवतो आणि मला तिचा हा साधेपणा अतिशय आवडतो. अर्थात ती सगळ्यांवर विश्वास ठेवते. तिला कोणीही काहीही सांगितलं, तर तिला लगेच पटतं. बऱ्याचदा तिच्या या स्वभावाचा लोक फायदा घेतात.

मला असं वाटतं, की तिनं असा सगळ्यांवर पटकन् विश्वास नाही ठेवला पाहिजे.’ याच मुद्द्यावर बोलताना ऊर्मिला म्हणाली, ‘एक माणूस म्हणून आपण लोकांकडे कसं बघावं आणि आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला असूनही त्यांच्यामुळे विचलित न होता आपलं काम कसं करत राहावं हे मी तिच्याकडून शिकतेय. ती तिच्या कामांबद्दल खूप जास्त क्लियर आहे. तिचा मला आवडणारा एक गुण म्हणजे सतत देत राहा.

परत आपल्याला काय मिळेल त्याचा विचार न करता, सतत दुसऱ्यांना देण्याची तिची प्रवृत्ती मला अतिशय आवडते. त्यासोबतच तिनं तिच्या या स्वभावाचा स्वतःवर काय परिणाम होतो याचाही विचार केला पाहिज. ती प्रत्येकवेळी इतरांसाठी ॲव्हेलेबल राहते. तिला नाही म्हणता येत नाही. तिला अनेक गोष्टी करायच्या आहेत; पण स्वतःसाठी स्टँड घेणं तिला जमत नाही. मला असं वाटतं, की तिनं हे बदललं पाहिजे आणि स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे. सोबतच तिची स्वप्नं तिनं पूर्ण केली पाहिजेत.’

एक किस्सा ऊर्मिला सांगत होती, ‘‘सुरुवातीला मला दुचाकी चालवायला खूप भीती वाटायची; पण तरीसुद्धा ती घ्यायची तर होतीच, कारण ती एक गरज होती. त्यामुळे मी आणि माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीनं सोबतच दुचाकी घेतली होती. एक दिवस आम्ही आणि आमचा अजून एक मित्र फिरायला जात होतो त्यावेळी ती मला म्हणाली, की मी त्याच्यासोबत जाते, तू पाडशील मला.

तिचं हे बोलणं ऐकून कुठंतरी मलाही भीती वाटायला लागली, की खरंच माझ्याकडून गाडी पडेल वैगरे. त्यानंतर मला आठवतंय मी आणि नम्रता जेव्हा कुठेतरी जात होतो, तेव्हा मी स्वतःहून तिला म्हणाले, की तू रिक्षानं ये. त्यावर नम्रता म्हणाली, ‘मी पडले तरी चालेल; पण मी तुझ्यासोबतच येईन. मला माहितीये तू मला नाही पाडणार.’ त्यावेळी तिनं माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याचा माझ्यावर खरंच खूप परिणाम झाला आणि माझ्या मनातली भीती नाहीशी झाली. त्यानंतर कधीच मी गाडी चालवताना घाबरले नाही.’’

नम्रता म्हणाली, ‘आज मी आणि ऊर्मिला आम्ही एकत्र एका छताखाली राहतो. ती माझी फक्त मैत्रीण नाही आहे, तर माझी दुसरी फॅमिलीच आहे. जसं आपल्या कुटुंबातील माणसं आपल्या चांगल्या वाईटात आपल्यासोबत असतात, तसंच उर्मिला नेहमी माझ्यासोबत असते. मला खात्री आहे, की जिथं जिथं मला तिची गरज असेल तिथं ती नेहमीच माझ्यासाठी असेल.’

(शब्दांकन : मयूरी  गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com