
आर्ची सचदेव
प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे खास स्थान असते. माझ्यासाठी माझी आई सगळं काही आहे! लहानपणापासूनच मला फारसे मित्र नव्हते; पण तरी कधी एकटेपणा जाणवला नाही. कारण, आयुष्यातील प्रत्येक चढउतारात आई माझ्याबरोबर होती. ती केवळ माझी आईच नव्हे, तर माझी बेस्ट फ्रेंड, माझी सगळ्यांत मोठी शिक्षिका आहे. माझ्याबद्दल विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे.