
अनिता दाते आणि स्वानंद बर्वे
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलेले अनिता दाते आणि स्वानंद बर्वे हे केवळ सहकलाकार न राहता एकमेकांचे जिवलग मित्र झाले आहेत. सुरुवातीला प्रोफेशनल नातं असलेली ही ओळख आता मैत्रीच्या रेशीमनात्यात गुंफली गेली आहे. सेटवरच्या हास्यविनोदांपासून ते गंभीर चर्चांपर्यंत, या दोघांनी अनेक आठवणी आणि अनुभव शेअर केले आहेत. एकमेकांमधल्या सवयी, स्वभाव आणि mutual admiration यावर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अशाच त्या नात्याच्या गडद रंगांची साक्ष देतात.