

रेणुका दफ्तरदार आणि राधा सागर
चित्रपटसृष्टीत अनेकदा कलाकारांच्या भेटी हा कामाचा भाग असतो; पण काही वेळा या भेटी मैत्रीच्या सुंदर नात्यात परिवर्तित होतात. ‘सुशीला सुजित’ या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री राधा सागर आणि रेणुका दफ्तरदार यांचं जुळलेलं नातं त्याचं उत्तम उदाहरण ठरतं. या दोघींची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती; पण या अल्प काळात एकमेकांना समजून घेणं, विचारांची देवाणघेवाण आणि नात्यातला खरा आपुलकीचा स्पर्श त्यांनी अनुभवला.