Fruits For Wrinkles : चेहऱ्यावर सुरकूत्या येऊच नयेत म्हणून काय करावं?

आहारात या फळांचा नेहमी समावेश करा
Fruits For Wrinkles
Fruits For Wrinklesesakal

Fruits For Wrinkles : तुमच्यात असलेला उत्साह तुम्हाला म्हातारं बनवत नाही. पण, तुमच्या चेहऱ्यावर असलेल्या सुरकुत्या तुमचं वय लपवू शकतं नाहीत. पुरूष असो वा स्त्री प्रत्येकालाच तरूण रहायचं असतं. तरूणपणी असलेला उत्साह म्हातारपणी राहत नाही. त्यामुळेच म्हातारपण नकोसं वाटतं.

तुमचं वय वाढत आहे असं कोणी तुम्हाला बोललं तर ते कोणालाच आवडत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकूत्या नकोशा वाटतात. बरं या सुरकूत्या महिला मेकअपने झाकू शकतात. पण प्रश्न येतो तो पुरूषांचा. त्या बिचाऱ्यांना गपचूप लोकांचे बोलणं ऐकावं लागतं.

आपली त्वचा कालांतराने खराब होऊ लागते. जीवनशैली आणि आहाराशी संबंधित कमतरता त्वचेला हानी पोहोचवतात. याशिवाय, आजूबाजूचे प्रदूषित वातावरण त्वचेतील आर्द्रता हिरावून घेते आणि कोलेजनचे नुकसान करते. (Fruits For Wrinkles : These 4 fruits are helpful in reducing wrinkles and signs of aging on the face, include them in your diet from today)

Fruits For Wrinkles
Summer Skin Care: चेहऱ्याला लावा हा फ्रूट ज्यूस आणि पहा कमाल; २ आठवड्यात Wrinkles होतील गायब, चेहरा दिसेल तरुण

वयानुसार चेहऱ्यावर सुरुकुत्या येणं ही सामान्य गोष्ट आहे. पण बदललेल्या जीवनशैलीमुळे या सुरुकुत्या वयाच्या आधीच येण्याची सुरुवात झाली आहे. शरीरात कोलेजन कमी झाल्यामुळे त्वचा आतून रूक्ष होते. त्यामुळे तिची लवचिकता कमी होते.

हायड्रेशन कमतरतेमुळे त्वचेतील सुरकुत्यांची समस्या वाढू लागते. या तुम्ही अशा काही फळांचे सेवन करू शकता जे तुमच्या त्वचेला आतून मुलायम ठेवतो. त्यामुळे त्वचा आतून टाईट राहते.

सुरकुत्या येऊच नयेत म्हणून आहारात या फळांचा नेहमी समावेश करा

संत्री

त्वचेच्या अनेक समस्यांवर संत्री हा उपाय ठरू शकतो. संत्र्यामध्ये Vitamin C चांगले असते. ते बारीक रेषा आणि रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळते. याशिवाय संत्र्यामध्ये हायड्रेशन भरलेले असते आणि त्यामुळे त्वचेला आतून ओलावा येतो. यामुळे त्वचेचे छिद्र निरोगी राहतात, सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात आणि त्वचेत दीर्घकाळ चमक राहते. (Fruits For Health)

Fruits For Wrinkles
Homemade Face Scrubs : साखर किंवा कॉफी नव्हे तर या 4 गोष्टींपासून तयार करा स्क्रब, चेहऱ्याची त्वचा होईल नितळ व स्वच्छ

सफरचंद

सफरचंदातील अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी करू शकतात. ते तुमच्या त्वचेचे pH निरोगी ठेवतात आणि प्रदुषणापासून त्वचेचे संरक्षण करतात. तुम्ही सफरचंद खाल्ल्याने तुमच्या त्वचेलाही फायदा होतो.

हे कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासह चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करते. म्हणूनच निरोगी त्वचेसाठी दररोज 1 सफरचंद खा. (Beauty Tips)

Fruits For Wrinkles
Masoor Dal Face Pack: मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे…

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये ओमेगा -3 देखील समृद्ध आहे जे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते. हे त्वचेतील बारीक रेषा कमी करते, मुरुम कमी करते आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यास मदत करते. याशिवाय, त्याचे अन्न शरीरातील हायड्रेशन आणि पीएच संतुलन राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. (Avocado)

किवी

किवीचे सेवन केल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. किवी तुमच्या कोलेजन आणि इलास्टिनच्या पातळीला उत्तेजित करते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई चांगल्या प्रमाणात असते. हे वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढा देते.

आपल्या नैसर्गिक कोलेजन उत्पादनाच्या नुकसानापासून देखील संरक्षण करते. म्हणून, या फळांचे सेवन करा आणि त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवा आणि ती निरोगी बनवा. (Face Care Tips)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com