Gardening Tips : कितीही काळजी घेतली तरी कढीपत्त्याचे झाड काही वाढत नाही, हा प्रयोग करून पहा

झाडासाठी औषध कसं बनवाव?
Gardening Tips
Gardening Tips esakal

Gardening Tips : ग्रामिण भागात गेलात तर तुम्ही पहाल की प्रत्येकाच्या दारात, परसात कढीपत्त्याचे एखादं तरी झाड असतच. कढीपत्त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे अनेकांना आपल्या घरातील बागांमध्ये कढीपत्ता लावायला आवडते. मात्र, खूप काळजी घेऊनही कढीपत्त्याच्या रोपाची वाढ होत नाही.

थोड वाढलेलं रोप असेल तरी घाईच्या वेळी कढीपत्त्याची पाने तोडली जातात. त्यामुळे त्याची वाढ लगेचच खुंटते.विशेषतः पावसाळ्यात कढीपत्त्यावर किडींचा प्रादुर्भाव होतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स पाळून कढीपत्त्याची काळजी घेऊ शकता. (Gardening Tips for Curry Plant)

Gardening Tips
Home Garden: कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त भाज्या उगवा त्याही तुमच्या घरी..

कढीपत्त्याच्या झाडाला विशेष काळजी घेण्याची गरज नाही. त्याचे बी कुठेही पडले तरी उगवतात. पण, त्याला घरी आणून त्याची खास काळजी घेतली नाही तर त्याची वाढ अचानक थांबते. अशातच जर पानांवर एखादी अळी बसली तर त्यामुळे कढीपत्त्याची पाने गायब होतात. त्यामुळेच काही उपायांनी तुम्ही कढीपत्त्याच्या झाडाला नवे जीवन देऊ शकता.

कढीपत्त्याशिवाय कोणतीही फोडणी पूर्ण होऊ शकत नाही. केवळ स्वयंपाक नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही कढीपत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच रोज फ्रेश कढीपत्ता हवा असेल तर झाडाची कशी काळजी घ्यावी हे पाहुयात.

सूर्यप्रकाश आणि पाण्याकडे लक्ष द्या.

काही लोक कढीपत्ता बाल्कनीत लावतात. तिथे त्याला पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. कोणत्याही झाडाला वाढण्यासाठी योग्य सूर्यप्रकाश हवा असतो. त्यामुळे कढीपत्त्याचे झाड बहरावे यासाठी कढीपत्त्याच्या झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश हवा.

कोणच्याही झाडाची अती काळजी घेतली की त्याची वाढ खुंटते. झाडाला खत आणि पाणी योग्य प्रमाणात मिळाले तरच त्याची वाढ होते. त्यामुळे खत आणि पाणी घालण्याच्या बाबतीत घाई करू नका. कढीपत्त्यात पाण्याचे प्रमाणही समान असावे. जास्त पाणी घातल्यास कढीपत्ता कुजण्याची भीती असते.

झाडासाठी कडुलिंबाचे तेल

कढीपत्त्याच्या झाडापासून किडीला दूर ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळी औषधे आहेत. पण, घरीच नैसर्गिक पद्धतीने बनवलेले तेल झाडाला योग्य पोषण देईल. थोड्या पाण्यात कडुलिंबाचे तेल टाका आणि हे पाणी स्प्रेमध्ये भरून त्याने झाडावर स्प्रे करा. किडे काढून टाकण्यासाठी तुम्ही कडुनिंबाच्या तेलाऐवजी शॅम्पू देखील वापरू शकता.

Gardening Tips
Eden Garden Stadium : आधी वेळापत्रकाचा गोंधळ आता स्टेडियमलाच लागली आग... बीसीसीआयच्या अडचणीत वाढ

झाडासाठी बनवा औषधं

कढीपत्ता व्यवस्थित वाढण्यासाठी एप्सम मीठ खत घालून तुम्ही त्याची वाढ वेगवान करू शकता. यासाठी १ लिटर पाण्यात १ चमचा एप्सम खत आणि १ चमचा मॅग्नेशियम सल्फेट मिसळून द्रावण तयार करा. नंतर रोपावर फवारणी करावी. हे द्रावण दर दीड महिन्याने टाकल्यास कढीपत्त्याची झाडे लवकर वाढू लागतात.

Gardening Tips
Gardening Tips: तुमच्या घरात 'या' तिन औषधी वनस्पती हव्याच

या गोष्टी लक्षात ठेवा

  1. कढीपत्त्याच्या झाडाला जास्त पाणी घालू नका.

  2. झाडाला व्यवस्थित सुर्यप्रकाश मिळेल अशा जागी ते ठेवा.

  3. कढीपत्त्याच्या झाडाची छाटणी आणि छाटणी करण्यास विसरू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com