Garud Puran : प्रगतीच्या आड येणाऱ्या लोकांपासून सावध राहीलंच पाहिजे, पण त्यांना ओळखायचं कसं?

फसवी व्यक्ती थेट नजर भिडवण्यास टाळाटाळ करते
Garud Puran
Garud Puranesakal

Garud Puran : हिंदू धर्मग्रंथांमध्ये पौराणिक गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. पुराणात सांगितलेले उपदेश, कथा यांचे वाचन, पालन केले जाते. आज आपण अशाच एका पुराणात सांगितलेल्या काही उपदेशांबद्दल जाणून घेऊयात. जे तुमचं जीवन जगणं सोप्प करतील.

तुम्ही चांगले समजून ज्या लोकांशी बोलत असता. तेच कधीकधी तुमच्या पाठीत खंजीर खुपसत असतात. तुमच्या माघारी बोलत असतात अन् तुम्हाला नावं ठेवत असतात. अशा लोकांमुळेच आपले अधिक नुकसान होत असते. केवळ आर्थिक नुकसान नाहीतर त्या लोकांच्या अशा वागण्यामुळे अनेकदा चांगल्या व्यक्तीही तुमच्या विरोधात जात असतात. 

हिंदू संस्कृतीत गरुड पुराणाला महत्त्वाचे स्थान आहे. यात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संभाषणाचा उल्लेख आहे. हिंदू धर्मात हे पुस्तक एखाद्याच्या मृत्यूनंतर वाचले जाते. मात्र अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मानवी जीवनाशी निगडित आहेत.(Garud Puran: Identify the cheaters with these symptoms, then there will be no hindrance in progress)                                

Garud Puran
Garud Puran : गरुडपुराणात दिलंय जीवनात यशस्वी होण्याचं सोपं तंत्र

या गोष्टींचे अनुसरण केल्याने माणूस आयुष्यात कधीही मूर्ख बनू शकत नाही. तुमच्या पदरात सतत यश येईल. गरुड पुराणात माणसाच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्याद्वारे फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवता येते.

नजर चुकवणारे लोक

फसवी व्यक्ती थेट नजर भिडवण्यास टाळाटाळ करते. अशा तऱ्हेने जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत असते किंवा तुम्हाला फसवत असते. तेव्हा तो डोळा चोरण्याचा प्रयत्न करतो. बोलता बोलता तो तुमच्या डोळ्यांकडे पाहू शकणार नाही आणि त्याचे डोळे आजूबाजूला आहेत.

शारीरिक हलचाली

गरुड पुराणानुसार जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला फसवत असेल तेव्हा तो तुमच्याशी संभाषण करताना पायावर पाय टाकून बसलेले किंवा तो मध्येच हातपाय हलवू लागेल. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती संभाषणादरम्यान लक्ष देत नसेल आणि त्याचे खांदे वाकलेले असतील तर तो तुमच्याशी खोटं बोलत असेल. (Astrology

Garud Puran
Shiv Puran : इतर कुठे नाही पण, या 4 ठिकाणी माणसाने गपचूप सहन करावा अपमान...

चेहऱ्यावरील हावभाव

जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत असेल किंवा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागतील. अशावेळी एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा आधी त्याचा चेहरा बघा, ती व्यक्ती सहज खोटं बोलू शकते, पण चेहरा त्याचं रहस्य उघडतो. (Lord Vishnu)

घाबरलेला आवाज

फसवी व्यक्ती बोलताना घाबरलेली दिसते. ही धावपळ त्यांच्या भाषणात स्पष्टपणे दिसून येते. अशी व्यक्ती बोलताना मध्येच अडखळते. तुटक-तुटक बोलते किंवा अडखळल्यावर अपूर्ण राहीलेलं वाक्य काहीही जोडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. जर एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसली तर त्याच्यापासून अंतर ठेवणे चांगले ठरेल.

Garud Puran
Garud Puran : महिलांनी श्राद्ध, तर्पण अन् पिंडदान करावे का? शास्त्र सांगते...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com