esakal | गॅस लीक झाल्यावर घ्या 'ही' खबरदारी
sakal

बोलून बातमी शोधा

Gas-Cylinder

गॅस लीक झाल्यावर घ्या 'ही' खबरदारी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

पूर्वीच्या काळी स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करायच्या. मात्र, आता या चुलीची जागा गॅसने घेतली आहे. आज प्रत्येकाच्या घरात गॅस असल्याचं पाहायला मिळतं. कोणताही पदार्थ पटकन करायचा असेल तर गॅस सोयीचा पडतो.त्यामुळे गॅस हा गृहिणींचा जणू जवळचा मित्रच झाला आहे. मात्र, घरात गॅस सिलेंडर वापरत असताना त्याची योग्य ती काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. अनेकदा आपल्या हलगर्जीपणामुळे गॅस लीकेज होतो किंवा तत्सम प्रॉब्लेम येतो. अनेकदा हा हलगर्जीपणा आपल्या जीवावरही बेतू शकतो. म्हणूनच गॅस सिलेंडरचा वापर कसा करावा व त्याची काळजी कशी घ्यावी. (gas-leak-safety-precautions)

हेही वाचा: सार्वजनिक ठिकाणी मोफत WIFI वापरताय?; मग घ्या 'ही' काळजी

१. सिलेंडरमधून गॅस लीक होत असेल तर काड्यापेटी (माचिस), तेल, लायटर यांसारखे ज्वलनशील पदार्थ सिलेंडरपासून दूर ठेवा.

२. दररोज स्वयंपाक झाल्यावर रेग्युलेटर बंद करा.

३. गॅसचा वास येत असेल तर प्रथम घरातील दारं-खिडक्या उघडा. तसंच इलेक्ट्रिक फॅन किंवा एग्जॉस्ट फॅन चालू करु नका.

४. गॅसचा वास येऊ लागल्यावर प्रथम नाक आणि तोंड रुमालाने झाकून घ्या.

५. घरातील हिटर, उदबत्ती, दिवा लगेच बंद करा.

६.घरात शक्यतो लाकडी सामानाचा वापर कमी करा.

७. घरात हवा खेळती ठेवा.

८. सिलेंडर कधीही अडगळीच्या जागी ठेऊ नका.

loading image