esakal | सार्वजनिक ठिकाणी मोफत WIFI वापरताय?; मग घ्या 'ही' काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

free wifi

सार्वजनिक ठिकाणी मोफत WIFI वापरताय?; मग घ्या 'ही' काळजी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात वायफायचा वापर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफायची सुविधादेखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज असंख्य जण रेल्वे स्थानक, मॉल, मेट्रो स्टेशनवर बिंधास्त मोफत वायफायचा वापर करतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरत असताना काही गोष्टींची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, बऱ्याचदा यामुळे ऑनलाइन फ्रॉड होण्याची शक्यता अधिक असते. (education-career-tech-safety-tips-for-using-public-wifi)

१. ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट ठेवा -

लॅपटॉप वा मोबाईल या दोन्ही गोष्टी अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहे. नव्या अपडेटसोबत सिक्योरिटी सिस्टीमदेखील अपडेट होत असते. त्यामुळे सहाजिकच तुमच्या गॅझेटची सिक्युरिटी वाढते. इतकंच नाही तर फोनमध्ये असलेल्या जुन्या फिचर्समुळे हॅकर्स तुमचा फोन हॅक करु शकतात. त्यामुळे फोन, लॅपटॉप कायम अपडेट ठेवत जा.

हेही वाचा: सिंगल फादर आहात? असा मॅनेजर करा ऑफिस, मुलांसाठीचा वेळ

२. बॅकेचे व्यवहार करु नका -

सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरताना कधीही बॅकेचे व्यवहार किंवा ऑनलाइन शॉपिंग करु नका. कारण, यावेळी तुमचे पासवर्ड चोरी होण्याची शक्यता अधिक असते.

३. अँटी व्हायरस टूलचा वापर करा -

सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापर करताना मोबाईल, लॅपटॉपमध्ये अँटी व्हायरल टूलचा वापर नक्की करा. त्यामुळे सिक्युरिटीची समस्या निर्माण होत नाही. तसंच जर तुम्ही वायफायचा वापर करत नसाल तर वायफायचा ऑप्शनदेखील बंद ठेवा.

हेही वाचा: relationship: स्त्रियांना सतत वाटते 'या' गोष्टींची भीती

४. टू फॅक्टर व्हेरिफिकेशन -

वायफाय वापरत असताना टू फॅक्टर व्हेरिफिकेशनचा वापर नक्की करा. त्यामुळे सिक्युरिटी स्ट्राँग होण्यास मदत मिळते. तुम्ही कधीही नेट सुरु केलं की तुम्हाला एक सिक्युरिटी कोड विचारला जातो. ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरित्या लॉगइन करु शकता.

loading image