

How to Save LPG Gas During Diwali Faral Preparation: 5 Simple Kitchen Tips
sakal
DIWALI FESTIVAL COOKING TIPS: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात फराळाची तयारी, चिवडा, लाडू, चकली आणि करंज्या बनवण्याची लगबग सुरू झाली असेल. सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरात गॅसचा वापर तेवढाच वाढतो. अशावेळी गॅस सिलिंडर लवकर संपला की ऐन दिवाळीत अडचण होऊ शकते. म्हणून तो स्मार्टली कसा वापरता येईल आणि जास्तीत जास्त गॅसचा वापर कसा करता येईल हा प्रश्न प्रत्येक गृहीणीला पडतोच पडतो. तुम्हालाही दिवाळीच्या फराळाची तयारी करताना गॅसची बचत करायची असेल, तर स्वयंपाकाच्या पद्धतीत हे छोटे बदल नक्की करून पाहा. यामुळे गॅसचा योग्य वापर करण्यास मदत होऊ शकते.