Gen Z's Chanaging Food Culture and Cafe Hopping
sakal
Korean Culture India: नव्या काळाच्या वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आवडीनिवडींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. विशेषतः तरुण पिढी म्हणजेच जेन-झी ही आंतरराष्ट्रीय प्रभावाखालील खाद्यसंस्कृती स्वीकारण्यात अग्रेसर ठरत आहे. गेल्या काही वर्षांत कोरियन संगीत (के-पॉप), कोरियन चित्रपट (के-ड्रामा), वेब सिरीज आणि नाट्यसंस्कृती यांची जगभरात वाढलेली लोकप्रियता भारतीय तरुणांनाही मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे. त्याचाच परिणाम म्हणून कोरियन खाद्यपदार्थांना मिळणारे प्रचंड प्रतिसादाचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.