

A Touch of Nostalgia: Why Gen Z Loves Physical Letters? Snail mails are getting viral over social media
Gen Z Goes Analog;Snail Mail: व्हॉट्सॲप, जीमेल आणि इन्स्टंट मेसेजिंगच्या काळात 'टपाल' किंवा 'पत्र' ही गोष्ट भूतकाळात जमा झाली आहे असे वाटत असतानाच एका नव्या ट्रेंडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात लहानाची मोठी झालेली आजची तरुणाई म्हणजेच 'जेन झी' (Gen Z) आता हाताने लिहिलेल्या आणि सुंदर सजवलेल्या पत्रांसाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे. सोशल मीडियावर सध्या 'स्नेल मेल' (Snail Mail) नावाचा हा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय होत आहे.