
General Knowledge : बाथरुम, वॉशरुम अन् टॉयलेटमध्ये काय फरक आहे?
आपण दैनंदिन जीवनात बाथरुम, वॉशरुम अन् टॉयलेट हे शब्द सहज उच्चारतो. मी टॉयलेटला जाऊन येतो, मी वॉशरुमला जाते.. असं आपण बोलताना अनेकदा ऐकले असेल पण तुम्हाला बाथरुम, टॉयलेट आणि वॉशरुममधील फरक माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (General Knowledge Know difference between bathroom toilet and washroom)
बाथरुम, वॉशरुम आणि टॉयलेटमधील फरक काय?
बाथरुम
बाथरुम हे आंघोळीचे ठिकाण असते. यालाच आपण स्नानगृह म्हणतो. बाथरुममध्ये प्रामुख्याने शॉवर, बादली आणि आंघोळीचे सर्व सामान असते.
वॉशरुम
वॉशरूम ही एक अशी रुम असते ज्यामध्ये बेसिन आणि टॉयलेट सीट दोन्ही असते. इथे आरसासुद्धा असतो. येथे तुम्ही चेहरा किंवा हात धुवू शकता पण इथे अंघोळ करायला जागा नसते. येथे तुम्ही कपडे सुद्धा चेंज करू शकत नाही. वॉशरुम हे सहसा मॉल्स, सिनेमा हाऊस, ऑफिसमध्ये असते.
टॉयलेट
टॉयलेट हा शब्द फक्त टॉयलेट सीट बसवलेल्या जागेसाठीच वापरला जात जातो. येथे काही टॉयलेट सोप किंवा हँडवॉशशिवाय दुसरं काहीही नसतं.