Global Day Of Parents 2024 : मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी 'या' गोष्टींकडे द्यावे लक्ष

Global Day Of Parents 2024 : विभक्त कुटुंबपद्धती, आई-वडिलांच्या नोकरीमुळे मुलांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही.
Global Day Of Parents 2024
Global Day Of Parents 2024esakal

Global Day Of Parents 2024 : निद्रानाश, अभ्यासात लक्ष न लागणे, व्हिडिओ गेम्स सतत खेळत राहणे, अतिरेकी मोबाईलचा वापर, कमी बोलणे किंवा चिडचिडेपणा, प्रेमभंग, बिभत्स भाषा असलेली रिल्स तयार करण्याची सवय आणि लहान वयातच लागलेले एखादे व्यसन अशा समस्या घेऊन समुपदेशकांकडे जाणाऱ्या पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याचे दिसून येत आहे.

विभक्त कुटुंबपद्धती आणि आई-वडिलांच्या नोकऱ्या यामुळे मुलांकडे पुरेसे लक्ष देता न येणे, हेच याचे कारण असल्याचे समुपदेशक अधोरेखित करत आहेत. सजग पालकत्वासाठी आता पालकांनीच पाऊले उचलण्याची गरज आहे.

Global Day Of Parents 2024
Global Day Of Parents: आज जागतिक पालक दिन, जाणून घ्या इतिहास अन् महत्व

पुण्यातील अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालवल्यानंतर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नेमक्या पालकांच्या जबाबदाऱ्या काय, यावर चर्चा सुरू झाली. अगदी घराघरांत मुले आणि पालकांत छोट्या-मोठ्या गोष्टींवरून कुरबुरी सुरू आहेत.

मोबाईल वापरू नको ते ‘त्या’ मित्रांच्या संगतीत राहू नको, अशा विषयांपर्यंत पालकांच्या सूचना मुलांना ऐकाव्या लागत आहेत. याउलट मुलेही पालक वेळ देत नाहीत, सूचना फार करतात, अशी तक्रारी करत आहेत. अशावेळी मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी पालकांनीच स्वतःमध्ये बदल करावेत, असा सल्ला कुटुंब समुपदेशक देत आहेत.

मुले अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे मुलांना सूचना देताना त्या गोष्टी सुरुवातीला स्वतः कराव्यात. जसे मोबाईल न वापरणे, मुलांसमोर पुस्तके वाचणे, गरज नसेल तेव्हा वाहन न वापरणे, कुटुंबासोबत गप्पा मारणे आणि एकत्रित जेवायला बसणे, मुले अभ्यास करताना त्यांना सोबत करणे अशा छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना वेळ देत संवाद साधला तर सजग पालकत्वाचे सकारात्मक परिणाम दिसणार आहेत.

हल्ली मुलांचा एकाग्रतेचा कालावधी कमी झाला आहे. यासाठी स्क्रिनटाईम कारणीभूत आहे. एकाग्रता वाढविण्यासाठी पालकांनीच ध्यानधारणा, योगासने मुलांसोबत करावीत. मुलांमध्ये अभिव्यक्ती, लिखाण व वाचनकौशल्ये वाढविली पाहिजेत. स्वतंत्र व्यक्ती म्हणून मुलांचा आदर केला पाहिजे.

- शैला टोपकर, कुटुंब समुपदेशक

करिअरच्या मागे धावताना मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष होते. यासाठी योग्य वेळ, योग्य आहार व योग्य संस्कार देऊन मुलांना पर्याय उपलब्ध करा तरच मुले आधुनिकतेकडे अतिरेकी न धावता पारंपरिक गोष्टींमध्ये गुंतली जातील.

- सुमेधा कुलकर्णी, पालकमंच

पालकांनी ‘या’ चुका टाळाव्या

 • आपल्या मुलांची इतरांशी तुलना करू नये

 • इतरांसमोर मुलांवर ओरडू नये

 • मुलांवर कधीही हात उगारू नये किंवा त्यांना मारू नये

 • मुलांचे नको ते हट्ट पुरवू नये

 • मुलांना नाही बोलायला शिका

 • मुलांचे लेबलिंग करू नये किंवा त्यांना दोष देऊ नये

पालकांनी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात?

 • पालक म्हणून आधी स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावा

 • पालकांनी मुलांशी मैत्री करावी

 • मुलांच्या भावनांचा विचार करावा

 • मुलांना काय सांगायचे आहे ते ऐकून घ्यावे

 • मुलांच्या मतांचा आदर करा

 • मुलांना निर्णय घ्यायला शिकवा

 • मुलांना नकार पचवायला शिकवा

 • मुलांचे वेगळेपण जपले पाहिजे.

 • मुलांशी संवाद साधला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com