
Gold Jewelry
Sakal
सोन्याचे दागिने केवळ शोभेचे साधन नसून, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक स्टाइल यांचा संगम आहेत.
पारंपरिक पिवळ्या सोन्यासोबत रोझ गोल्ड आणि व्हाइट गोल्ड यांनाही मागणी आहे.
कस्टमाइज्ड पेंडंट्स, जियोमेट्रिक आकारातील दागिने आणि स्टेटमेंट इअररिंग्स हेही ट्रेंड्स आहेत. लाइटवेट ज्वेलरीला नोकरदार महिलांची पसंती आहे.
सोन्याचे दागिने हे केवळ शोभेचे साधन नसून, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक स्टाइल यांचा सुंदर संगम आहे. दैनंदिन वापरासाठी साधे डिझाइन्स आणि खास प्रसंगांसाठी पारंपरिक जडजवाहीर अशा दोन्ही प्रकारांत सोन्याची चमक कायम आहे. पारंपरिक पिवळ्या सोन्यासोबत आता ‘रोझ गोल्ड’ आणि व्हाइट गोल्ड’ यांनाही मागणी आहे. कस्टमाइज्ड नावाचे पेंडंट्स, जियोमेट्रिक आकारातील दागिने आणि स्टेटमेंट इअररिंग्स हेही ट्रेड्स आहेत. पारंपरिक डिझाइन्सची ज्वेलरी लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगांमध्ये परिधान केले जातात. कुंदन, मीनाकारी, पोल्की वर्क, टेम्पल ज्वेलरी ही डिझाइन्स अजूनही लोकप्रिय आहेत. दक्षिण भारतीय शैलीतील देव-देवतांचे कोरीव काम असलेले हार किंवा बांगड्या, तसेच महाराष्ट्रातील पैठणी आणि मोरपंखी डिझाइन्स अजूनही आवडीने घातले जातात.