
युक्रेनचं राहू द्या, मोदींनी महागाईवर बोलावं, राऊतांचा टोला
देशात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव ५० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे आता ९९९.५० रुपयांवर सिलेंडरचे दर पोहोचले आहेत. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. नरेंद्र मोदींपासून भाजपचा एकही नेता सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. एकानेही आतापर्यंत सिलेंडरवर भाष्य केलेलं नाही.
महाराष्ट्रात लाऊड स्पीकरचा मुद्दाच नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. काही लोकांनी दंगली करण्याचा प्रयत्न केला. पण या राज्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार काम होतं. त्यामुळे दंगली करणाऱ्या आणि हिंदू-मुस्लीम दंगे घडवणाऱ्यांना धडा मिळाला आहे.
मशिदींच्या मुद्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला आहे. कीर्तन आणि जागरणांना बसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. पण सुदैवाने राज्यातील जनतेने याला किंमत दिली नाही.
पंतप्रधान मोदी युरोपात जाऊन रशिया आणि युक्रेनबद्दल भाष्य करतात. त्यांना या देशांची चिंता आहे. त्यासंदर्भात ते मध्यस्ती करत आहेत. यावर त्यांचे भक्तही वाह वा करत आहेत. पण देशातील जनता बेरोजगारी, महागाईने त्रस्त आहे. सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीबद्दल कोणीही बोलायला तयार नाही,असं राऊत म्हणाले.
राज्यातील महागाईवर एकही भाजप नेता बोलत नाही. पण भोंग्यांवर बोलतात. पंजाबचे पोलीस काय करतायेत, महाराष्ट्राचे पोलीस काय करतायेत, हे प्रश्न भाजपवाले विचारतात. देशातीत महागाईवर बोलायला एकही नेता तयार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
Web Title: Sanjay Raut Alleges Modi Government Over Inflation And Gas Cylinder Rates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..